Mhada Redevelopment : दक्षिण मुंबईतील म्हाडा (Mhada) इमारतींसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. 30 वर्ष जुन्या म्हाडा इमारतींच्या पुनर्विकास (Redevelopment) केला जाणार आहे. जवळपास 388 इमारती मध्ये 30 ते 40 हजार कुटुंब राहतात, या निर्णयामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ३३(२४) या खंडामध्ये सुधारण करून ३३ (७) चे सर्व फायदे लागू करून इमारतींचा पुनर्विकास होणार आहे. म्हाडा संघर्ष कृती समिती (MHADA Sangharsh Action Committee) आणि भारतीय जनता पार्टी म्हाडा सेल (Bharatiya Janata Party MHADA Cell) यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शहरात जुन्या आणि मोडकळीस आलेल्या 14 हजारहून अधिक इमारतींपैकी अनेक इमारतींची म्हाडाने पुनर्बांधणी केली आहे. पण 388 इमारतींना 30 वर्ष पूर्ण ने झाल्याने नव्या नियमावालीचा लाभ घेता येत नव्हता. या इमारतींच्या पुनर्विकासासाठी पुरेसं चटई क्षेत्रफळ उपलब्ध नसल्याने इमारतींच्या पुनर्विकासासाठी विकासक पुढे येत नव्हते.


ही बाब लक्षात घेऊन विकास नियंत्रण नियमावलीत सुधारणा करण्यात आली. पण यात केवळ पंतप्रधान अनुदान प्रकल्पातील 66 इमारतींचाच समावेश होता. उर्वरित 388 पुनर्रचित इमारतींचा यात उल्लेख नसल्याने या इमारतींचा पुनर्विकास रखडला होता. आता मुख्यमंत्र्यांच्या निर्णयामुळे या इमारतींच्या पुर्विकासाचा मार्गही मोकळा झाला आहे.