COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई: संततधार कोसळत असलेल्या पावसामुळे मुंबईत अक्षरश: जलकोंडी झाली आहे. त्यामुळे एमएमआरडीए क्षेत्रातल्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. आज सकाळपासून मुंबईत सर्वत्र संततधार सुरु आहे. ठाणे, कल्याण, अंबरनाथ, बदलापुरात इथल्या शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबरच वसई, विरार, डहाणूतही शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.


वसईत मिठागरांमध्ये ४०० लोक आवडले


वसई विरारमधल्या पावसाचा फटका मिठागरातल्या लोकांना बसलाय. मिठागरांमध्ये पाणी शिरल्यानं चारशे लोक अडकलेयत. सकाळी सात वाजेपासून हे लोक मीठागरांमध्ये अडकले आहेत. प्रशासनाचे अधिकारी अजुनही घटनास्थळी पोहचले नाहीत. ढिम्म प्रशासनाचा फटका या लोकांना बसतोय., या भागात पावसाचा जोर वाढल्यानं रस्ते जलमय झालेयत. 


रेल्वेच्या तिन्ही मार्गाची वाहतूक उशीराने सुरू


सततच्या पावसाचा फटका लोकल सेवेला बसला असून तिनही मार्गावरची सेवा उशीराने सूरू आहे. पच्छिम रेल्वेवर नालासोपारा स्थानकात रूळावर पाणी आल्याने लोकला वेग मर्यादा घालण्यात आली आहे. तर मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल देखील कित्येक मिनीट उशीराने धावतायेत...