Maharashtra Police Bharti 2022, मुंबई : महाराष्ट्राच्या पोलिस भरतीसाठी(Police Recruitment 2022) प्रयत्न करणाऱ्या तरुणांना मोठा दिलासा निर्णय शिंदे फडणवीस सरकारने घेतला आहे. पोलीस भरतीचा अर्ज(Maharashtra Police Bharti 2022) दाखल करण्यासाठी तब्बल 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis)  यांनी ही माहिती दिली. ऑनलाइन पद्धतीने अर्ज (Online Application) भरताना सर्व्हर डाऊन असल्याने  उमेदवारांना तांत्रिक अडचणी येत होत्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आतापर्यंत तब्बल 11 लाख 80 हजार उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाल्याची माहिती देखील फडणवीस यांनी दिली. अर्ज भरताना उमेदवारांना अनेक अडचणी येत होत्या. यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांना अर्ज भरता आले नाहीत. यामुळे अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी अशी मागणी करण्यात येत होती. त्याला राज्य सरकारनं सकारात्मक प्रतिसाद देत मुदतवाढ देण्याचा निर्णय मान्य केला आहे. 


पोलिस भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्यासाठी 30 नोव्हेंबर पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली होती. मात्र, सर्व्हर डाऊन असल्याने उमेदवारी अर्ज यशस्वीपणे भरले जात नव्हते. यामुळे अनेकांचे अर्ज भरले गेले नाहीत. आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्ज भरण्यासाठीची मुदत आणखी 15 दिवसांनी वाढवल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे आता 15 डिसेंबर ऑनलाइन अर्ज भरता येणार आहेत.


कोरोनाकाळात पोलीस भरतीसह विविध खात्यांमधील नोकर भरतीला स्थगिती देण्यात आली होती. आता पुन्हा नोकर भरती प्रक्रियेला सरकारने वेग दिला आहे.