अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई : एखाद्या आयोजित पार्टीत अनुचित प्रकार घडल्यास तात्काळ दिलेल्या परवानग्या रद्द केल्या जातील, असा सज्जड इशाराच मुंबई पोलिसांनी यंदा पार्टी आयोजक तसंच हॉटेल चालक मालकांना दिलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदही थर्टी फस्टच्या पार्टी करता पहाटे ५ वाजेपर्यंत पब, हॉटेल, बार आणि वाईन शॉप खुले ठेवण्याची परवानगी देण्यात आलीय. पण, यंदा पब, हॉटेल, वाईन शॉप आणि बार यामध्ये येणाऱ्या प्रत्येकाच्या सुरक्षेची जबाबदारी ही पब, हॉटेल, वाईन शॉप आणि बार चालक व मालकांवर असणार आहे. मुंबई पोलीसांनी तसं चोख सुरक्षा ठेवण्याचे परीपत्रकच काढलाय. 
 
आपल्याकडे जास्तीत जास्त ग्राहक आकर्षित कसे होतील यासाठी हॉटेल, पब, बार चालक विशेष तयारी करत आहेत. त्यातच पहाटे पाच वाजेपर्यंत हॉटेल, बार, बप सुरू ठेवण्याची परवानगी मिळालीय. पण यामुळे कोणाताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुंबई पोलिसांनी हॉटेल, बार, पबचालकांना नोटीस पाठवलीय. त्यानुसार काही अनुचित प्रकार हॉटेलमध्ये घडला तर हॉटेलशी संबंधित सर्व परवानग्या रद्द होतील
 
पब, हॉटेल, बारमध्ये गाणी वाजवण्यास परवानगी असेल पण ध्वनीप्रदूषण झाल्यास कठोर कारवाई होईल. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोलीस वेळेची परवानगी काढू शकतात. महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी हॉटेल, पब, बार चालकांना घ्यावी लागेल. पार्कींग भागात सीसीटीव्ही लावणे अनिवार्य असेल.


या नोटीशींमुळे मुंबईतले हॉटेल, बार, पबवाले बुचकळ्यात सापडले आहेत. त्यामुळे पहाटे पाच वाजेपर्यंत मिळालेली परवानगी फायद्याची आहे की अडचणीत आणणारी असा प्रश्न त्यांना पडलाय.