मुंबई  : मुंबई क्राइम ब्रांचने सोमवारी एका 43 वर्षीय हॉटेल व्यापाऱ्याला आपल्या कर्मचार्‍यांना वेतन न देण्याच्या आरोपाखाली आणि लोकांची लूट करण्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, मुंबईच्या चांदीवली आणि पवईच्या भागात स्थित हॉटेलचे मालक कृतेश पिपलानींना (Kritesh Piplani) फोन कॉल रेकॉर्डच्या आधारावर अटक झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पिपलानीने पोलिसांचा सांगितले की, 28 नोव्हेंबर 2019 ला जेव्हा त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांची सॅलरी देण्यासाठी पैसे काढण्यासाठी एका एटीएममध्ये गेला आणि त्याने 60 हजार रुपये काढले. परंतु त्याला रस्त्यात किडनॅप करण्यात आले.


एक मारुती इको कारमधील दोन माणसांनी त्याला किडनॅप केले असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर त्याला जेव्हा शुद्ध आली तेव्हा त्याने पाहिले की, तो आरे कॉलनीमध्ये रस्त्यावर आहे आणि त्याच्याकडचे 60 हजार रुपये गायब झाले आहे.


सीसीटीव्ही रेकॉर्डिंगमध्ये अशी कोणतीही घटना नाही


क्राइम ब्रांचच्या अधिकऱ्यांनी सांगितले की, त्यांना पिपलानीची ही कहाणी संदिग्ध वाटली त्यामुळे त्यांनी याची सखोर चौकशी सुरु केली. त्यांनी पवईमधील एटीएममधील सीसीटीव्ही आणि आरे मिल्क कॉलनीतील सीसीटीव्ही रेकॉर्डिंग तपासले.


तेव्हा त्यांना कळले की, अशी कोणतीच घटना घडलेली नाही. त्यानंतर पोलिसांनी लूट मारीचा आणि फसवणूकीच्या आरोपाखाली पिपलानीला अटक केली.


क्राइम ब्रांच 10च्या एका अधिकाऱ्याने सांगितले, "पिपलानी ने कबूल केले की, त्याला त्याच्या हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना पगार द्यायचा नव्हाता आणि ज्यामुळे त्याने चोरी झाल्याची योजना आखली. " अधिकारी म्हणाले की, पिपलानीला पुढील तपासणीसाठी पवई पोलिसांकडे देण्यात आले आहे.