नवी दिल्ली : इराणची राजधानी तेहरान येथून चीनला जाणाऱ्या एका प्रवासी विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळताच धावपळ सुरु झाली. हे विमान दिल्ली आणि जयपूरच्या हवाई क्षेत्रावर ४५ मिनिटे घिरट्या घालत होते. विमानाबाबत अजूनही अनेक शंका आहेत. या विमानाचे अपहरण झाले होते की भारताविरुद्ध कोणतेही षडयंत्र नव्हते. संरक्षणविषयक बाबींचे तज्ज्ञ ओपी तिवारी म्हणाले की, संपूर्ण जगात ज्या प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे, ते पाहता भारताने घेतलेला निर्णय पूर्णपणे योग्य आहे. त्यांनी सांगितले की, अमेरिकेत ९/११ च्या हल्ल्यानंतर भारतात पीएफआयवर बंदी घालण्यात आली आहे आणि युक्रेन-रशिया-चीनमध्ये ज्या प्रकारे तणाव सुरू आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेता प्रत्येक पाऊल हलकेच उचलावे लागेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एअर व्हाइस मार्शल (आर.) ओपी तिवारी म्हणाले की, 'विमानात बॉम्ब किंवा अपहरण झाले असेल, तर वैमानिक आणि क्रू मेंबर्सच्या संदेशावरून विमानातील स्थिती कळते. तेही जर हे दोघे कोणत्याही कटाचा भाग नसतील तर. या सर्वांचा विचार करूनच कोणताही निर्णय घेतला जाईल. आता हे विमान इराणहून चीनला जात होते, दिल्ली त्याच्या मार्गात येत नाही. उतरायचे झाले तर लाहोर अगदी जवळ होते. तो लाहोरला का गेला नाही? यात मोठी शंका आहे, त्याची चौकशी व्हायला हवी.


इराणहून चीनला (iran to china flight) जाणाऱ्या विमानाला भारतीय सैन्याच्या लढाऊ विमानांनी (Fighter Jet) घेरलं होतं. विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्यानंतर भारतात खळबळ उडाली होती. या विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळाली तेव्हा ते भारताच्या हवाई हद्दीत होते. अशा परिस्थितीत सुरक्षा यंत्रणांसोबत भारतीय हवाई दलही सतर्क झाले. आयएएफच्या सुखोई फायटर जेटने विमानाला वेढा घातला. हे विमान भारतीय हवाई हद्दीबाहेर जाईपर्यंत हवाई दलाच्या विमानांनी त्यावर लक्ष ठेवले होते. या प्रकरणी हवाई दलाने एक निवेदनही जारी केले आहे.


ही घटना सोमवारी सकाळी घडली. महान एअरने इराणमधील तेहरान येथून चीनमधील ग्वांगझूला उड्डाण केले. तेव्हा त्यात बॉम्ब असल्याची माहिती मिळाली. भारतीय हवाई दलाच्या म्हणण्यानुसार, जेव्हा ही माहिती मिळाली तेव्हा ते विमान भारताच्या हवाई हद्दीत होते. यानंतर हवाई दलाने आपली विमाने तैनात केली. मात्र, ते इराणी विमानापासून सुरक्षित अंतरावर उडत होते.


विमानात बॉम्बची धमकी दिल्यानंतर भारतातील सर्व सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. हे विमान तेहरानहून चीनच्या ग्वांगझूला जात होते. विमान भारतीय हवाई हद्दीतून बाहेर पडेपर्यंत भारतीय सुरक्षा यंत्रणांनी त्यावर बारीक नजर ठेवली होती. भारतीय हवाई दलाने हवाई स्थानके आणि विमान वाहतूक युनिट्सलाही सतर्क केले आहे. भारतीय एजन्सींनी या विमानावर बारकाईने लक्ष ठेवले होते.


हवाई दलाच्या म्हणण्यानुसार, भारतीय वायुसेनेने नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि नागरी उड्डाण सुरक्षा ब्युरो यांच्या सहकार्याने विहित प्रक्रियेनुसार ही कारवाई केली गेली. जोपर्यंत हे विमान भारतीय हवाई हद्दीत होते, तोपर्यंत हवाई दलाकडून त्यावर लक्ष ठेवले जात होते.


हवाई दलाच्या म्हणण्यानुसार या विमानाला जयपूर आणि नंतर चंदिगडमध्ये उतरण्याचा पर्याय देण्यात आला होता. पण पायलटने या ठिकाणी विमान उतरवण्यास नकार दिला, नंतर इराणी एजन्सींनी बॉम्ब नसल्याचा अहवाल दिल्यानंतर ते चीनच्या दिशेने नेण्यास परवानगी देण्यात आली.