मुंबई : महाराष्ट्राच्या रणसंग्रामात कुणाचा झेंडा फडकणार आहे, याचे अंदाज सगळ्यात आधी झी २४ तास दाखवणार आहे. झी २४ तासनं सगळ्यात आधी सर्वेक्षण करुन २८८ जागांचा अंदाज सर्वप्रथम मांडलाय... पाहुया कुणाच्या बाजूनं आहे हा आकड्यांचा खेळ 


मुंबई


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


युती झाल्यास मुंबईत भाजपाला १६, शिवसेनेला १५, काँग्रेसला ४, राष्ट्रवादीला शून्य तर इतर पक्षांना १ जागा मिळण्याचा अंदाज आहे..तर युती झाली नाही तर मुंबईत भाजपाला १४, शिवसेनेला १५, काँग्रेस ५, राष्ट्रवादी १ तर इतर पक्षांना १ जागा मिळण्याचा अंदाज आहे. 


ठाणे-कोकण


ठाणे, कोकणमध्ये युती झाल्यास भाजपाला १३, शिवसेनेला २१, काँग्रेस ०, राष्ट्रवादी ३ आणि इतर पक्षांना २ जागा मिळण्याचा अंदाज आहे... तर युती न झाल्यास भाजपा १६, शिवसेना ११, काँग्रेस २, राष्ट्रवादी ४ तर इतर पक्षांना ६ जागा मिळण्याचा अंदाज आहे. 


पश्चिम महाराष्ट्र


पश्चिम महाराष्ट्रात युती झाल्यास भाजपाला ३३, शिवसेना १६, काँग्रेस ४, राष्ट्रवादी १३ तर इतर पक्षांना ४ जागा मिळण्याचा अंदाज आहे.... युती झाली नाही तर पश्चिम महाराष्ट्रात भाजपाला २६, शिवसेना ७, काँग्रेस १०, राष्ट्रवादी १९ तर इतर पक्षांना ८ जागा मिळण्याचा अंदाज आहे.


अर्ध्या महाराष्ट्राचा कौल


अर्ध्या महाराष्ट्राचा कौल म्हणतो युती झाल्यास १४५ जागांपैकी भाजपाला ६२, शिवसेनेला ५२, काग्रेस ८, राष्ट्रवादी १६ आणि इतर पक्षांना ७ जागा मिळण्याचा अंदाज आहे.... तर युती न झाल्यास भाजपाला ५६, शिवसेनेला ३३, काँग्रेस १७, राष्ट्रवादी २४ तर इतक पक्षांना १५ जागा मिळण्याचा अंदाज आहे..


हे झालं अर्ध्या महाराष्ट्राचं चित्र. उर्वरित महाराष्ट्राचा अंदाज फक्त झी २४ तास दाखवणार आहे...शनिवारी संध्याकाळी ५ वाजता..