मुंबई : चीनचं अवकाश स्थानक टायोगाँग दक्षिण प्रशांत समुद्रात कोसळलं. त्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्रवरचा धोका टळला आहे. 8 टन वजनाचं हे अवकाश स्थानक मुंबई किंवा महाराष्ट्रात कोसळण्याची भीती व्यक्त होतं होती. 


चीनवरही निर्माण झाला होता धोका


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रत्यक्षात अवकाशातून आज पहाटे पृथ्वीच्या कक्षेत दाखल झाले. त्यानंतर ते दक्षिण पॅसिफक समुद्रात कोसळलं. भारतीय वेळेनुसार 6.43 मिनिटांनी अवकाश स्थानकानं वातावरणात प्रवेश केला. तर अवघ्या तीन ते चार मिनिटात 6.46 मिनिटांनी अवकाश स्थानक ताहिती देशाच्या समुद्र हद्दीत कोसळलं. 


काय झालं नेमकं


विशेष म्हणजे रात्री या स्थानकानं वातावरणातील प्रवेशाचा मार्ग बदलला. त्यामुळे हे स्थानक मुंबई किंवा महाराष्ट्रावर न पडता थेट चीनमध्येच कोसळण्याची शक्यता निर्माण झाली. जर तसं झालं असतं, तर अनेकांच्या जीविताला धोका निर्माण झाला असता. प्रत्यक्षात अवकाश स्थानक वातावरणात शिरल्यावर त्याचा वेग कमी झाला. आणि त्यामुळे हे अवकाश स्थानक प्रशांत महासागरात कोसळलं.


बातमीचा व्हिडिओ



या घटनेनंतर अनेकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.