मुंबई : नोकरी मिळवण्यासाठी सगळ्यात महत्वाचं असतं तुमचा CV. प्रत्येक क्षेत्रात तगडे प्रतिस्पर्धी असल्यामुळे एका नोकरीसाठी हजारोंच्या संख्येत रिक्रूटर्सजवळ बायोडाटा येत असतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यामधील अगदी निवडक CV चं मॅनेजरपर्यंत पोहोचतात आणि त्यांना मुलाखतीचा कॉल येतो. पण या निवडक सीव्हीमध्ये तुमचा नंबर कसा लागेल अशी प्रत्येकाला प्रश्न असतो. याचं उत्तर आज तुम्हाला इथे मिळणार आहे. 


१) CV मध्ये सर्वात कमी चुका करा - जेव्हा रिक्रूटर्स अनेकांचे बायोडाटा पाहत असतात तेव्हा सर्वात प्रथम ते ग्रॅमेटिक मिस्टेककडे पहिलं लक्ष देतात. त्यामध्ये कवरिंग लेटर आणि सीव्हीमध्ये असलेल्या चुका लगेच लक्षकेंद्रित करतात. आपल्या CV ला कायम टेक आणि किवर्ड फ्रेंडली बनवा कारण CV रिक्रूटरकडे पोहोचण्याआधी अनेक गोष्टींमधून जात असतो. 


२) CV सोबत पाठवणारे कवरिंग लेटर हे ज्या एक्सपिरियन्ससाठी पाठवत आहात त्याप्रमाणे असले तर त्याचा जास्त फायदा होतो. चांगल्या प्रकारे लिहिलेल्या या कवरिंग लेटरमुळे नोकरी मिळण्याची संधी अधिक असते. अनेकदा रिक्रूटर कवरिंग लेटर बघूनच कॅन्डिडेटला बोलवण्याचा निर्णय घेतात. 


३) CV चा फॉरमेट असा असावा की अगदी बघताच क्षणी आनंद वाटेल. तुमचं हस्ताक्षर रिक्रूटरला CV ओपन करण्यास भाग पाडेल. 


४) अनेकदा असं देखील लक्षात आले आहे की, नोकरी कोणत्या डेसिगनेशनसाठी आहे हे न पाहताच कँडिडेट आपला CV पाठवून देतात. त्यामुळे पूर्णपणे त्या उमेदवाराला चुकीचे ठरवू शकत नाही. त्यामुळे कायम आपण कोणत्या पदासाठी अप्लाय करत आहोत. याचा सर्वात प्रथम विचार करावा. 


५) शेवटची पण सर्वात महत्वाची माहिती म्हणजे आपल्यालाच स्वतःच मार्केटिंग करावं लागतं. हल्ली अनेक रिक्रूटरसोशल मीडियाचा वापर करतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून २०% अधिक तुमची माहिती जाणून घेतात. त्यामध्ये स्वतःच स्वतःला कायम अपडेट ठेवा.