मुंबई : मुलुंडमधल्या एटीएममध्ये कार्डचं क्लोनिंग करुन चोरट्यांनी अनेकांच्या पैशांवर डल्ला मारला. हे तुमच्या बाबतीत घडू नये म्हणून काळजी घेणं गरजेचं आहे. सुरक्षारक्षक नसलेल्या एटीएममधून पैसे काढू नका. ATM केंद्रात सीसीटीव्ही आहे की नाही, याची खात्री करा. तुम्ही कार्ड टाकता, त्याच्या खाली काही यंत्रणा लावलीय का ?, हे तपासून पाहा.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कार्ड ATMमध्ये टाकता त्या ठिकाणी लाईट ब्लिंक होतोय का, हे तपासून पाहा तुमच्या अकाऊंटमधून पैसे काढल्याचा मेसेज आलाच, तर लगेच कार्ड ब्लॉक करा तातडीनं पोलीस स्टेशन आणि बँकेत तक्रार करा. महत्त्वाचं म्हणजे आधार कार्ड बँक अकाऊंटला लिंक करण्याची लगबग सध्या सुरू आहे. त्याची संधी साधत काही भामटे तुम्हाला फोन करतील. तुमचा आधार कार्ड नंबर सांगा, नाही तर तुमचा अकाऊंट बंद होईल. तुमचा अकाऊंट नंबर सांगा.  तुमचा पॅन नंबर सांगा नाही तर अकाऊंट बंद होईल. तुमच्या अकाऊण्टचा पिन नंबर सांगा. असे कोणतेही फोन आले तरी त्यांना कोणतीही माहिती देऊ नका. कारण कुठलीही बँक फोन करुन असे नंबर विचारत नाही. त्यामुळे अशा फोन्सना आणि त्यांच्या धमक्यांना भीक घालू नका. कुणालाही पिन नंबर सांगू नका.


तुमची एक चूक एका क्षणात तुमच्या अकाऊण्टमधले पैसे गायब करेल. त्यामुळे पैशांचे, एटीएमचे व्यवहार करताना थोडी सावधानता नक्कीच फायद्याची आहे