मुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. मुंबई आणि उपनगरात सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे मरे पुन्हा एकदा कोलमडली. दुपारी 12 नंतर मध्य रेल्वेची वाहतूक बंद झाली. सायन ते माटुंगा दरम्यान मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने वाहतूक बंद करण्यात आली. गेल्या 6 तासांपासून मरे ठप्प असल्याने प्रवाशी अडकून पडले आहेत. सकाळी कामावर आलेल्या चाकरमान्यांची घरी जाण्याची वेळ झाली आहे. त्यामुळे आता दादर आणि सीएसएमटी रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी उसळली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पावसामुळे सीएसएमटी ते ठाणे वाहतूक लोकलसेवा ठप्प आहे. सीएसटीहून एकही लोकल सोडली जात नाही आहे. सर्व इंडिकेटर्स देखील बंद आहे. त्यामुळे सीएसएमटी स्थानकावर प्रचंड गर्दी झाली आहे. लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या रद्द करण्यात करण्यात आल्या असून काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.