मधुचंद्राच्या रात्री वधूकडे न पाहता नवरदेव नक्की काय करतोय viral photo video
सोशल मीडियावर प्रत्येक दिवशी एखादा फोटो व्हायरल होत असतो, हा फोटो चर्चेत असतो. मात्र आज असा एक फोटो आणि व्हिडीओ
मुंबई : सोशल मीडियावर प्रत्येक दिवशी एखादा फोटो व्हायरल होत असतो, हा फोटो चर्चेत असतो. मात्र आज असा एक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्याला पाहून तुम्ही नक्कीच हैराण व्हाल. फोटोत एक नवरदेव आणि नवरी दिसतेय. लग्नाच्या पहिल्या रात्रीचा हा फोटो आहे. पहिल्या रात्री आख्खी रुम फुलांनी सजवली आहे. नवरा मुलगा मात्र कम्प्युटरवर बसला आहे. नवऱ्या मुलाकडे पाहून मुलगी रूसली आहे.
कारण लग्नाच्या पहिल्या रात्री नवरीला वेळ देणे आवश्यक असताना, नवरदेव मात्र कम्प्युटरसमोर बसला आहे. या फोटोत नववधूवराची ही स्थिती का अशी झाली आहे, असा प्रश्न प्रत्येक फोटो पाहणाऱ्याला नक्कीच पडतोय. म्हणून हा फोटो आणखी व्हायरल होत आहे.
हा फोटो आयटी कंपनीत काम करणाऱ्यांनी जास्त डोक्यावर घेतला आहे, या फोटोची बातमी देखील आयटी क्षेत्रातील काम करणाऱ्यांनीच जास्तच जास्त शेअर केल्याचं दिसून येत आहे.
एकूण कॉर्पोरेट जगतातील कामावर भाष्य करणारा हा फोटो आहे. काहींना म्हणायचं आहे की, नवरा मुलगा हा त्याच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर टाकण्यात व्यस्त आहे, तरी काहींनी म्हटलं आहे, नवरदेव वर्क फ्रॉम होम (Work Frome Home) करतोय. एकूणच वर्क फ्रॉम होम म्हणजे तुमचं लग्न जरी असेल तरी त्या दिवशी घरून काम करा, असा देखील काहींनी अर्थ काढला आहे.
सोशल मीडियावर हा फोटो खूप मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. यावर वेगवेगळ्या प्रकारचे मिम्स बनवले जात आहेत. Hold On Babe let me check my twitter notification." तर काही लिहित आहेत,"Hold on babe let me delete my search history.