मी राजीनामा द्यायला तयार पण... पाहा राजीनाम्याबाबत काय म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
`आजपासून मी वर्षा निवासस्थानावरचा मुक्काम हलवतोय, पण समोर येऊन बोला`
Uddhav Thackeray Live : महाराष्ट्रात सत्तासंघर्ष सुरु असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray)यांनी जनतेशी फेसबूकद्वारे संवाद साधला. उद्धव ठाकरे फेसबूकच्या माध्यमातून कोणती मोठी घोषणा करणार याकडे राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं.
मुख्यमंत्र्यांचं भाषण जसंच्या तसं
माझी कोविड टेस्ट पाॅझिटीव्ह. बोलण्यासराख बरेच. कोविड काळात लढाई लढलो. कठिण काळात कोणीही तोंड दिले नाहि अश्या परिस्थितीत मला.जे कराचे ते प्रश्न प्रमाणिक पणे केले. तेव्हा देशातील पहिल्या पाच राज्यात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री म्हणून मी होतो.
माध्यमात अनेक अफवा पसरवल्या गेल्या. मी भेटत नव्हतो हे काहि दिवस शक्य नव्हते. कारण शस्त्रक्रिया झाली होती. आता सुरुवात केली आहे. शिवसेना हिंदुत्वापासून दूर होऊ शकत नाही म्हणूनच आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे आणि इतर नेते अयोध्येला गेले. हिंदुत्वावर बोलणारा मी पहिला मुख्यमंत्री.
ही बाळासाहेबांची शिवसेना नाही अशी बातमी पसरवण्यातत आली. 2014 एकट्याच्या ताकदीवर 63 आमदार शिवसेनेचे निवडून आले ते ही हिंदुत्वावर. शिवसेना कुणाची बाळासाहेबांची हे खरं आहे, पण बाळासाहेबांनंतर मधल्या काळात जे मिळाले ते याच शिवसेनेनं दिलं.
आता काही आमदार गायब झाले आहेत. काही आमदारांचे फोन येतात. काल परवा विधानपरिषदेची निवडणुक झाली. तेव्हा हॉटेलमध्ये गेलो तेव्हा बोललो ही कुठली लोकशाही. शंका ठिक पण लघु शंकेला गेला तरी शंका, हे असलं राजकारण मला नकोय.
मी इच्छेपेक्षा जिद्दीने पूर्ण करणारा व्यक्ती आहे. कुठलाही अनुभव नव्हता. नाईलाजाने वेगळा मार्ग घ्यावा लागला. विशेषतः शरद पवारांनी सांगितले जबाबदारी तुम्हाला घ्यायची आहे. पवारांचा सोनियाजींचा आग्रह म्हणून जिद्द केली .नुसता स्वार्थ नव्हता. वळणदार राजकारण कुणाचेच उपयोगाचे नाही. प्रशासनाची खूप मदत झाली.
सत्तेसाठी एकत्र आलो. सकाळी कमलनाथ आणि शरद पवारांनी मला फोन करुन माझ्यावर विश्वास दाखवला. पण माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री नको असेल तर मग काय करायचे? मी त्यांना आपले मानतो त्यांचे माहिती नाही. तुम्ही पळता कशाला? त्यांच्यापैकी कुणीही सांगितले की मी मुख्यमंत्री नको तर मी सोडायला तयार. आज मी वर्षावर मुक्काम हलवतोय. पण हे समोर येऊन बोला.
ज्याने घाव घातल्या जाताहेत त्याच्या वेदना अधिक. शिवसेनेचं लाकूड वापरून शिवसेनेवर वार करु नका. मला कोविड झालाय मी राजीनामा देतो पण तुम्ही समोर येऊन घेऊन जा. शिवसैनिक सोबत तोवर मी कुठल्याही आव्हानाला समोर जाईन. शिवसैनिकांना असे वाटत असेल तर मी पक्ष प्रमुख पद सोडायला तयार आहे. संकाटाला सामोरा जाणारा शिवसैनिक. पण शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असेल तर माझी तयारी आहे.
एकदा ठरवू या समोर या सांगा आम्हाला संकोच वाटतोय हे स्पष्ट सांगा. मी सोडायला तयार. आयुष्याची कमाई पद नाहीत. याच माध्यमातून मी तुमच्याशी बोललो. कुटुंब प्रमुख म्हणून मला अनेकांनी सांगितले. ही माझी कमाई. माझे हे नाटक नाही. माझ्यासाठी संख्या विषय गौण. संख्या कशी जमवता हे नगण्य. मी आपला मानतो त्यांनी मला सांगाव मी मुख्यमंत्री पद सोडतो. एकच सांगतो तुमचे प्रेम असे ठेवा.
जय हिंद जय महाराष्ट्र