Indigo विमानाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. Indigo चं विमान चेन्नईपासून मुंबईला येत होतं. पोलीस या घटनेची चौकशी करत आहे. Indigo Flight 6E-5188 मुंबई एअरपोर्टवर उतरणार होतं. विमान 40 किलोमीटर अंतरावर होतं जेव्हा एअर ट्रॅफिक कंट्रोलला टॉयलेटमधील टिश्यू पेपरवर फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याची माहिती मिळाली.


टिश्यू पेपरवर लिहिली होती बॉम्बची धमकी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्लाइटच्या टॉयलेटमध्ये टिश्यू पेपरवर धमकीची माहिती लिहीली असल्याचं आढळून आलं होतं. या फ्लाईटमधील टिश्यू पेपरवर लिहिलं होतं की, "माझ्या बॅगेत बॉम्ब आहे. जर आपण मुंबईत लँड झालो तर सगळे मरतील. मी दहशतवादी एजन्सीचा आहे. सगळे मरतील." 


टॉयलेटमध्ये सापडलेल्या टिश्यू पेपरवर असाच धमकीचा संदेश लिहिला होता, त्यामुळे विमानातील प्रवाशांमध्ये भीती आणि अशांतता पसरली होती. पोलिसांनी या घटनेबाबत माहिती दिली असून यासंदर्भात पुढील तपास सुरु आहे. 


विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित


फ्लाइटमध्ये धमकीची पत्रं आल्यानंतर स्थानिक पोलीस आणि इतर यंत्रणांना याची माहिती देण्यात आली. विमान विमानतळावर उतरताच सर्व प्रवाशांना घाईघाईने उतरवून विमानाची तपासणी करण्यात आली, मात्र विमानात असं काहीही आढळून आल्याची माहिती मिळाली आहे. मुंबई विमानतळ पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.


जानेवारीमध्ये देखील मिळाली होती धमकी


गेल्या जानेवारीत देखील विमानतळाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली होती. त्यावेळी बिहारच्या दरभंगाहून दिल्लीला येणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आलं होतं. त्यावेळीही विमानाची झडती घेतल्यानंतर विमानात काहीही सापडलं नाही.