मुंबई : मुंबईतील खाजगी रुग्णालयांच्या कारभारावर आता आयएएस अधिकाऱ्यांची करडी नजर असणार आहे. मुंबईतील महत्वाच्या मोठ्या ३५ खाजगी रुग्णालयांवर ५ आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ८० टक्के बेड ताब्यात घेण्याबरोबरच शासकीय दरानुसार बिल घेतले जाते की नाही यावरही आता लक्ष असणार आहे. नियमापेक्षा जादा बील उकळल्यास संबंधित अधिकाऱ्यांकडे ईमेलद्वारे तक्रार करता येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बेड उपलब्ध होण्यासंदर्भातील डॅशबोर्ड अंमलबजावणीला यामुळे हातभार लागणार आहे. मदन नागरगोजे, अजित पाटील, प्रशांत नारनवरे, सुशील खोडवेकर आणि राधाकृष्णन या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


कोरोना गंभीर रुग्णांच्या उपचारासाठी ‘रेमडेसीवीर’ इंजेक्शन खरेदी करणार


जसलोक रुग्णालय, ब्रिच कँडी रुग्णालय, एच.एन रिलायन्स रुग्णालय, भाटिया रुग्णालय, Holi Spirit, SRCC, मसिना रुग्णालय, व्हॉकहार्ट रुग्णालय, प्रिन्स अली खान, ग्लोबल रुग्णालय, टाटा मेमोरियल, के.जे सोमय्या, गुरुनानक रुग्णालय, एस.एल रहेजा रुग्णालय, लिलावती, Holi Family, सेव्हन हिल रुग्णालय, BSES रुग्णालय अंधेरी, कोकिलाबेन, सुशृषा रुग्णालय, हिंदू सभा रुग्णालय, संजीवनी, कोहिनूर, करुणा रुग्णालय, फोर्टिस रुग्णालय मुलुंड, एल.एच हिरानंदानी रुग्णालय, अपेक्स सुपर स्पेशालिटी रुग्णालय, अपेक्स रुग्णालय, SRV chembur, conwest and manjula S. Badani jain hospital या रुग्णालयांवर अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.