मुंबई : घर घेणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. स्टेट बँकेने आपल्या गृह कर्जात (Home Loan) मोठी कपात केल्यानंतर आता खासगी बँकांना होम लोनच्या व्याज दरात कपात केली आहे. त्यामुळे घर घेणे अधिक सुलभ झाले आहे. ICICI Bankने गेल्या10 वर्षांतील सर्वात स्वस्त होम लोन दर जाहीर केला आहे. यामुळे नव्या कर्ज योजनेअंतर्गत ग्राहक 75 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकतात. (ICICI Bank home loan)


स्टेट बॅंकेच्या होम लोन व्याज दरात कपात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयसीआयसीआय बँकने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि गृह खरेदीदारांना दिलासा देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. प्रथम एसबीआयने गृह कर्ज स्वस्त केले. आता खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँकेने गृह कर्जावरील व्याज कमी केले आहे. (ICICI Bank also reduced interest rate after SBI) आयसीआयसीआय बँक आता होम लोन 6.70 टक्के व्याजदराने देणार आहे. तसे बँकेने जाहीर केले आहे. एसबीआयने अलीकडेच 6.70 टक्के गृह कर्जदर जाहीर केला होता. आयसीआयसीआय बँकेचे नवीन दर आज 5 मार्च 2021 पासून लागू झाले आहेत.


10 वर्षांत पहिल्यांदाज स्वस्त होम लोन 



ICICI बँकेच्या गृह कर्जावरील व्याजदरात कपात करण्यात आली आहे. SBI, HDFC, कोटक महिंद्रानंतर ICICI बॅकेंनेही व्याजदरात कपात केली आहे. आयसीआयसीआय बँकेचा मागील 10 वर्षातील हा स्वस्त गृह कर्ज दर आहे. याअंतर्गत ग्राहक 75 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकतात. 75 लाख रुपयांपेक्षा जास्त कर्जासाठी ग्राहकांना 6.75 टक्के व्याज द्यावे लागेल. हा सुधारित गृह कर्जाचा व्याज दर 31 मार्च 2021 पर्यंत उपलब्ध आहे.  (This cheapest home loan in 10 years)


या विशेष ऑफरमध्ये, जे ग्राहक आधीच बँकेचे ग्राहक नाहीत तेदेखील डिजिटल माध्यमातून होम लोनसाठी अर्ज करू शकतात. यासाठी आपण बँकेच्या वेबसाइटवर आणि मोबाइल बँकिंग अ‍ॅप आयमोबाईल पेवरही अर्ज करू शकता.