मुंबई : १३० कोटी जनतेची सामुहिक दिव्य शक्ती आपण कोरोनाशी लढण्यासाठी एकत्र आणूया. याकरता पंतप्रधान मोदींनी ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता जनतेला आपली ९ मिनिटे देण्यासाठी सांगितली आहे. थाळी नादाप्रमाणे पंतप्रधानांच्या या आवाहनाला देशभरातून प्रतिसाद मिळणार आहे. पण याची दुसरी बाजूपण समोर येत आहे. मोदींच्या आवाहनानुसार एकाच वेळी सगळ्यांनी वीज बंद केली तर त्याचा परिणाम विद्युतसंचावर होईल आणि ते बंद पडतील अशी भीती महावितरणच्या अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे पुन्हा सुरू करायला १२ ते १४ तासांचा कालावधी जाईल. या काळात सगळा वीज पुरवठा ठप्प असेल, त्याचा खूप वाईट परिणाम रुग्णालयांवर होईल असेही ते म्हणाले.



काय म्हणाले पंतप्रधान ?


जनतेची सामूहिक शक्ती दिव्य आहे. कोरोनाला प्रकाशाची ताकद दाखवूया. १३० कोटींची जनता एकाच संकल्पासोबत उभी राहणं गरजेचं आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या व्हिडिओत सांगितलं. कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या काळात आपण कुणीही एकट नाही. आपण आपल्या घरात एकटे नाहीत. १३० कोटींची जनता प्रत्येकासोबत आहे.


या कोरोनाशी आपण लढूया, अशा शब्दात मोदींनी देशातील लोकांशी संवाद साधला आहे. 


१३० कोटी जनतेची सामुहिक दिव्य शक्ती आपण कोरोनाशी लढण्यासाठी एकत्र आणूया. याकरता पंतप्रधान मोदींनी ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता जनतेला आपली ९ मिनिटे देण्यासाठी सांगितली आहे. यावेळी सगळ्यांनी आपापल्या घरातील लाईट बंद करायची आहेत.


यावेळी घराच्या दाराजवळ किंवा घराच्या बाल्कनीमध्ये उभं राहून हातात मेणबती, टॉर्च किंवा मोबाइलचे लाईट घेऊन वातावरण प्रकाशमय करायचं आहे. कोरोनाला आपण प्रकाशाची ताकद दाखवूया आणि कोरोनाशी लढूया असा संदेश मोदींनी यावेळी दिला.