मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) यांनी काल महाराष्ट्र्र सरकारने पेट्रोल, डिझेलवरील कर कमी करावा असं म्हटलं. पण, यावेळच्या अर्थसंकल्पात आम्ही कुठलाही कर लावलेला नाही. उलट काही कर कमी केलेत. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्र्रातील जनतेची दिशाभूल करू नये, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar ) यांनी लगावला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुठला कर कमी करावा आणि कुठचा वाढवायचा याचा निर्णय सर्व मंत्री मंडळ मिळून घेत असतात. आजच्या राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत हा विषय नाही. परंतु कालच्या चर्चेबाबत विचारू नंतर पुढची लाईन ऑफ एक्शन ठरवू असे ते म्हणाले.


इंधनावर आयातीनंतरचा कर हा केंद्रापेक्षा राज्याचा थोडा जास्त आहे. परंतु, केंद्र सरकारने नेहमी राज्यावर ढकलू नये. केंद्राला आमच्याकडून भरपूर कर जातो. पण, तेवढ्या प्रमाणात राज्याला निधी मिळत नाही हे वास्तव आहे. राज्यांना कारभार करायचा असतो आणि आम्हाला उत्पन्नाचे ठराविकच मार्ग आहेत, असे त्यांनी सांगितले.


भाजप नेते आमदार आशिष शेलार ( ashish shelar ) यांनी २०१७ मध्ये शिवसेना (shivsena ) , भाजप (BJP ) आणि राष्ट्रवादी ( NCP ) अशी युती होणार होती असा गौप्यस्फोट केला. त्यावर अजित पवार ( Ajit pawar ) यांनी ही २०१७ ची गोष्ट आहे. इतके दिवस काय केले? मागच्या गोष्टीत कुणाला रस नाही. सध्या काय सुरु आहे ते बघ, अशा शब्दात आशिष शेलार यांच्यावर टीका केली.


तेव्हा बरेच जण इकडे तिकडे होते. २०१४ मध्ये नवनीत राणा ( Navneet Rana ) राष्ट्रवादीच्या लोकसभेच्या उमेदवार होत्या. २०१९ ला आम्ही त्यांना पुरस्कृत केले होते. एकेकाळी ममाताही ( Mamta banarji ) भाजपसोबत होत्या. नितीशकुमारही ( Nitsih kumar ) कधी भाजप विरोधात होते. पण, याचा अर्थ सोबत असूच असे होत नाही. लोक त्यांना वाटेल त्याप्रमाणे निवडून देतात, असे ते म्हणाले.


राज ठाकरे ( Raj Thackarey  यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत 'लाव रे तो व्हिडीओ' करत भाजपवर टीका केली. मात्र, त्यावेळी ते शरद पवार यांची टीम 'बी' असल्याचे सांगत होते. पण, आता ते भाजपच्या बाजूने बोलत आहेत.


आता ते भाजपवर टीका करताना दिसत नाहीत. जर राज ठाकरे यांना राष्ट्रवादीची फूस असती तर त्यांनी पवार साहेबांना जातीवादी म्हटले असते का? असा सवालही अजित पवार यांनी केला.