Mumbai News: मुंबईत भल्यामोठ्या आणि उंच इमारतींची काही कमी नाहीये. मात्र अशा हायराईज बिल्डींग्समध्ये आग लागण्याच्या घटना देखील काही प्रमाणात घडत असतात. पण अशा घटनांवर आळा घालण्यासाठी मुंबईतील फायर ब्रिगेड आता एक्शन मोडमध्ये आली आहे. फायर ब्रिगेडच्या एका अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, उंच इमारतींना जानेवारी आणि जुलै महिन्यात वर्षातून दोनदा फायर ऑडिट अहवाल सादर करणं बंधनकारक असणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अग्निशमन दलाचे पथक अशा इमारतींना अचानक भेटी देतील आणि फायर ऑडिट न झाल्यास 10 दिवसांच्या आत पाणी आणि वीज कनेक्शन तोडलं जाऊ शकतं. गेल्या वर्षी मुंबईत अग्निशमन दलाला 15 हजार कॉल्स आले होते, त्यापैकी 5074 कॉल आगीसंदर्भात असल्याची माहिती होती.


मुंबईत एकूण 40 लाखांहून अधिक प्रॉपर्टी आहेत. यामध्ये 3629 उंच इमारती आणि 362 उंच इमारतींचा समावेश आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इशारे देऊनही सोसायटी आणि उंच इमारतींमध्ये अग्निसुरक्षा नियमांचं उल्लंघन होताना दिसतंय. त्यामुळे प्रत्येक प्रभागात मोठ्या इमारतींची यादी तयार करण्यात येतेय. जानेवारी आणि जुलैमध्ये फायर ऑडिट न केलेल्यांची यादी पाहिल्यानंतर अशा इमारतींची तपासणी केली जाणार आहे. प्रत्येक टीमद्वारे ही तपासणी करण्यात येणार असून प्रभागात अशा टीम तयार करण्यात येणार आहेत. 


अग्निशमन दलाकडे सध्या 90 मीटर उंचीपर्यंत पोहोचणाऱ्या शिड्या आहेत. यावेळी यांच्या मदतीने मदतीने 100 मीटर उंचीपर्यंतच्या इमारतींमध्ये आग विझवता येणं शक्य असणार आहे. उंच इमारतींमध्ये आग विझवणं हे मोठं आव्हान असते, त्यामुळे अशा इमारतींमध्ये स्प्रिंकलर बसवणं अग्निशमन दलाने बंधनकारक केलं आहे. अधिकाऱ्याने असंही सांगितलं की, इमारतींमध्ये 80 टक्के शॉर्ट सर्किटच्या घटना घडतात, त्यामुळे सोसायट्या आणि मोठ्या इमारतींमध्येही इलेक्ट्रिकल ऑडिट अनिवार्य करण्यात आलंय.