मुंबई : वेळ आल्यास  शिवसेना भवनही (ShivSena Bhavan) तोडू, असं वादग्रस्त वक्तव्य भाजप आमदार (BJP) प्रसाद लाड (Prasad Lad)  यांनी केलंय.माहीममध्ये (Mahim) राजा बढे चौकात भाजपच्या कार्यालयाचं (Bjp Office In Mahim) उद्घटान करण्यात आलं, यावेळेस लाड यांनी हे वक्तव्य केलं आहे. (If time comes we will demolish Shiv Sena Bhavan says  BJP MLA Prasad Lad in mahim)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लाड काय म्हणाले? 


"भाजपची ताकद काय आहे हे 2014 विधानसभा निवडणुकीत आपण दाखवलंय. कारण, त्यावेळी भाजप होती. भाजपला मानणारा कार्यकर्ता विचाराचा मतदार होता, तो आज पण भाजपसोबत आहे. त्यात आता सोने पे सुहागा हुआ है. नारायण राणे साहेबांना आणि राणे कुटुंबाला मानणारा स्वाभिमानचा एक मोठा गट राणेंच्या निमित्ताने भाजपात आला आहे. यामुळे भाजपची ताकद ही निश्चित दुप्पट झाली आहे. नितेशजी पुढच्या वेळेस आपण कार्यकर्ते हे थोडे कमीच आणू. कारण, आपण आलो की पोलिसही खूप येतात. फक्त त्यांना सांगायचं की वर्दी घालून पाठवू नका, म्हणजे हॉलमध्ये बसायला उपयोग होईल. त्यांचं कारण एवढी भीती तुमची आमची की त्यांना वाटतं की हे माहिममध्ये आले म्हणजे शिवसेना भवन फोडणारच. काही घाबरु नका, वेळ आली तर ते देखील करु", असं लाड म्हणाले.