मुंबईची होणार तुंबई! IMD कडून 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा
मुंबईसह उपनगरात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दांडी मारलीय.
मुंबई : मुंबईसह उपनगरात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दांडी मारलीय.त्यामुळे मुंबईकरांना पावसाची प्रतिक्षा लागली होती. मात्र मुंबईकरांची ही प्रतिक्षा आता संपणार आहे. कारण IMDच्या अंदाजानुसार मुंबईसह, ठाणे आणि उपनगरात येत्या 4 ते 5 दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.
आयएमडीच्या माहितीनुसार उत्तर ओडिशा व दक्षिण झारखंडात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. पश्चिम किनारपट्टीवर जोरदार वारे वाहतायत.त्यामुळे पुढील 5 दिवसांत मध्य भारत,पश्चिम किनारपट्टीवर मान्सून सक्रिय असणार आहे. याचा परिणामी महाराष्ट्रावर होणार असून येत्या ५ दिवसात पावसाच्या सरी बसण्याची शक्यता आहे.
आयएमडीच्या अंदाजानुसार, येत्या ५ दिवसात पावसाच्या इशारा देण्यात आला आहे. मुंबई ठाणे व आजूबाजूला येत्या ४,५ दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच मुंबईत पुरजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. या संदर्भातली माहिती पुण्याच्या हवामान विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी दिली आहे.