मुंबई :मुंबईच्या वेशीवरील सर्व टोलनाक्यांवर महिनाभरात फास्टॅगची शंभर टक्के अंमलबजावणी होणारेय. याआधी सी लिंक आणि मुंबई - पुणे एक्स्प्रेस वे वर फास्टॅग बंधनकारक आहे. एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात माहिती दिलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत प्रवेश करण्यासाठी दहिसर, मुलुंड, ऐरोली आणि वाशी याठिकाणी टोलनाके आहेत. या पाचही ठिकाणी 1 जानेवारी 2021 पासून फास्टॅग यंत्रणा बसविण्याचे आदेश एमएसआरडीसीनं दिले होते. त्या अनुषंगानं कामही सुरू झालं मात्र लॉकडाऊनमळे यासाठी आवश्यक असणारे सेन्सर थायलंडमधून येऊ शकले नाहीत. 



अखेरीस दहिसरमधला पथकर नाका वगळता चार नाक्यांवर ऑक्टोबरच्या मध्यावर फास्टॅग यंत्रणा कार्यरत झाली. सुरुवातीच्या टप्प्यांत प्रत्येक ठिकाणी तीन मार्गिकांवर फास्टॅग बसविण्यात आलेत. मुंबई-पुणे एक्प्रेस वे, वांद्रे-वरळी सी लिंकवर फास्टॅगला चांगला प्रतिसाद मिळतोय.