पुणे : राज्य मंडळाने बारावीचा निकाल जाहीर केल्यावर पदवीपूर्व स्तरावरील प्रथम वर्ष प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे.  मात्र केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई), कौन्सिल ऑफ इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनकडून (आयसीएसई) बारावीच्या परीक्षांचे निकाल जाहीर होणे बाकी आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे संबंधित मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेत दहा टक्के जागा राखीव ठेवण्याचा, गरजेनुसार महाविद्यालयांना दहा टक्क्यांपर्यंत जागा वाढवून देण्याचा निर्णय घेतला आहे.


दरवर्षी सीबीएसई, आयसीएसईच्या निकालानंतर राज्य मंडळाचे निकाल जाहीर होतात. मात्र  यंदा सीबीएसई, आयसीएसईने मूल्यमापन पद्धतीमध्ये बदल केल्याने बदल केल्याने या मंडळांचे निकाल जाहीर झालेले नाहीत. तसेच निकाल कधीपर्यंत जाहीर होणार या बाबत काहीच संकेतही देण्यात आलेले नाहीत.