अमित शहांच्या उपस्थितीत मुंबईत रात्री महत्वाची बैठक
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत, मुंबईमध्ये रात्री उशीरा भाजपची महत्त्वपूर्ण बैठक होत आहे.
मुंबई : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत, मुंबईमध्ये रात्री उशीरा भाजपची महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तार, नारायण राणे यांचा भाजप प्रवेश आणि पक्षाच्या इतर घडामोडींवर चर्चा होणार असल्याचं सांगितलं जातं आहे.
मंत्रिमंडळाच्या विस्तारावरील चर्चा देखील महत्वाची असल्याचं सांगण्यात येत आहे.काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या भाजप पक्ष प्रवेशाबद्दल चर्चेला सध्या राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे, या पार्श्वभूमीवर देखील या बैठकीकडे आणि बैठकीतील निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागून असल्याचं सांगण्यात येत आहे.