मुंबई : सध्या राज्यात सतत नेत्यांच्या भेटी होत आहेत. त्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. आज शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली विरोधी पक्षांच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. या बैठकीला 15 ते 20 विरोधी पक्षांचे नेते उपस्थित राहणार असल्याची शक्यता वर्तण्यात येत आहे. या महत्त्वाच्या बैठकीत शिवसेने दांडी मारल्यामुळे चर्चांनी जोर धरला आहे. आज शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले, 'शिवसेना आणि शरद पवार एकत्र आहेत. त्यामुळे भाजप सत्तेबाहेर आहेत. त्यांचं दुःख मी समजू शकतो.' 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


आजच्या  बैठकीबद्दल त्यांना विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणाले, 'शरद पवार एक मोठे नेते आहेत. त्यांच्यासोबत लोक कायम राजनीती, शिक्षण, अर्थव्यवस्था इत्यादी विषयी चर्चा करतात. देशाच्या विरोधी पक्षांची ही बैठक आहे. पण या बैठकीत सर्व विरोधी पक्ष नाही. शिवसेना विरोधी पक्ष आहे. एनडीएसोबत आम्ही त्याठिकाणी नाही.' 


यावेळी त्यांनी भाजप विरोधी, मोदींविरोधी असा शब्द प्रयोग कशाला? असा प्रश्न उपस्थित केला. 'राज्याला एका भक्कम विरोधी पक्षाची गरज आहे आणि शरद पवार ते करत आहेत तर त्यामध्ये काही चूक नाही. असं देखील म्हणाले. एकंदर पाहाता आता शरद पवारांच्या निवासस्थानी सुरू असलेल्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.