COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई :  तुमची एलआयसी पॉलिसी असेल किंवा एलआयसी पॉलिसी काढण्याच्या विचारात तुम्ही असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण सध्या एलआयसी पॉलिसीधारकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होतेय.


फसवणूक करणारे एलआयसी अधिकारी, आयआरडीएआय अधिकारी बनून ग्राहकांना कॉल करतायत. पॉलिसीची रक्कम तत्काळ मिळण्याच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक करतायत. ग्राहकांची फसवणूक होऊ नये  म्हणून एलआयसीने ट्वीट करून ग्राहकांना सावध केलंय.



फसवणूक टाळण्यासाठी तुम्ही काय कराल?


पॉलिसीबद्दल माहिती हवी असल्यास एलआयसीच्या अधिकृत वेबसाईटवर जा.
कोणत्याही क्रमांकावर कॉल करून पॉलिसीबद्दल माहिती मिळवू नका
कोणताही बनावट कॉल आला तर पोलीसांकडे तक्रार दाखल करा
spuriousclines@licindia.com या लिकंवरही तक्रार दाखल करू शकता
एलआयसी पॉलिसीबाबत कोणताही तपशील सामायिक करू नका
पॉलिसी सरेंडरची माहिती कोणालाही देऊ नका
अधिक फायदे देण्याच्या आमिषाला बळी पडू नका