मुंबई : पश्चिम रेल्वेवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. माहीम आणि वांद्रे स्थानकादरम्यान पुलाचे गर्डर उभारण्यासाठी शुक्रवार-शनिवार आणि शनिवार-रविवार मध्यरात्री आपत्कालीन ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. रात्री १२ ते पहाटे साडेपाच दरम्यान अप-डाऊन धीमा मार्ग आणि अप-डाऊन जलद मार्गावर हा ब्लॉक असणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


रात्रीच्या वेळी हा मेगाब्लॉक असल्याने प्रवाशांना पूर्ण वेळ याचा त्रास जाणवणार नाही. पण शुक्रवार ते रविवार दरम्यान पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना आपल्या कामाच्या ठिकाणाहून लवकर निघावे लागणार आहे. कारण रात्री १२ वाजता या मार्गांवरील शेवटची लोकल असणार असल्याने याची काळजी प्रवाशांना घ्यावी लागणार आहे.