मुंबई : ड्रग्ज केस प्रकरणी मागील 25 दिवसांपासून कोठडीत असणाऱ्या आर्यन खानला अखेर जामीन मंजूर झाला आहे. आर्यनसह मूनमून धमेचा आणि अरबाज मर्चंट या दोघांचा जामीनही मंजूर करण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलग तीन दिवसांपासून या प्रकरणावर सुनावणी सुरु होती. यादरम्यान विविध मुद्द्यांना अनुसरून युक्तिवाद मांडण्यात आला. ज्यानंतर गुरुवारी उच्च न्यायालयानं दोन्ही पक्षांच्या बाजू ऐकल्यानंतर जामीन मंजूर केला. 


NCB कुठे कमी पडली?


या सगळ्या प्रकरणात चॅट हा एकच पुरावा NCB कडे होता. यावर आर्यन आणि अरबाजच्या वकिलांनी हे चॅट जुनं असल्याचं म्हटलं. या चॅटवरुन ते कोणताही मोठा प्लॅन करतायेत असा संदर्भ लागत नाही.



एका चॅटचा दुसऱ्या चॅटचा कुठलाही संबंध नाही. आजची तरुणाई वापरत असलेले शब्द हे शॉ्रट फॉममध्ये किंवा वेगवेगळ्या पद्धतीने वापरतात. ड्रग्सशी संबंधित शब्द ते कधी चॅटमध्ये वापरतात त्यामुळे हा गैरसमज निर्माण होऊ शकतो असा युक्तिवाद आर्यनच्या वकिलांनी केला.


इलेक्ट्रॉनिक पुरावे घ्यायचे असतील तर त्यासाठी प्रमाणपत्र NCB ला मिळवणं गरजेचे असतं. जे NCB कडे नाही. त्यामुळे या कमकुवत बाजू कोर्टात ठेवून आर्यनच्या वकीलांनी जामीन मंजूर करण्यात यश मिळवलं.