मुंबई : राज्यात दररोज सुमारे ४ हजार कोरोना रुग्ण बरे होऊन घरी जात आहेत. तसेच १ लाख  ७ हजार ६६५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यात मंगळवारी ४५०० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.६७ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ४९  हजार ००७  झाली आहे, असे ते म्हणालेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, मंगळावारी कोरोनाच्या  ६७४१ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १३ लाख  ७२ हजार नमुन्यांपैकी २ लाख ६७ हजार ६६५ नमुने पॉझिटिव्ह (१९.४९ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ९८ हजार ८५४ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४२ हजार ३५० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.



राज्यात काल  २१३ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ४ टक्के एवढा आहे. राज्यात नोंद झालेले २१३ मृत्यू हे मुंबई मनपा-७०, ठाणे-१५, ठाणे मनपा-१५, नवी मुंबई मनपा-८, कल्याण-डोंबिवली मनपा-७, उल्हासनगर मनपा-७, भिवंडी-निजामपूर मनपा-१२, वसई-विरार मनपा-८, रायगड-२, पनवेल मनपा-१, नाशिक-१, नाशिक मनपा-५, अहमदनगर-२, अहमदनगर मनपा-२, धुळे मनपा-२, जळगाव-७, जळगाव मनपा-१, पुणे-६, पुणे मनपा-१०, पिंपरी-चिंचवड मनपा-९, सोलापूर-३, सोलापूर मनपा-३, सातारा-१,सांगली मिरज कुपवाड मनपा-१, रत्नागिरी-२, औरंगाबाद मनपा-४, परभणी-१, परभणी मनपा-१, लातूर-२, नांदेड-३,अकोला-१, बुलढाणा-१, नागपूर मनपा-१, भंडारा-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.