राज्यात पुन्हा मास्कची सक्ती होणार?
कोरोनाचा (Corona) जोर ओसरल्यानंतर राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी सर्व निर्बंध शिथिल केले. मात्र राज्य सरकारने (Maharashtra Government) मास्क वापरणं ऐच्छिक ठेवलं होतं.
मुंबई : कोरोनाचा (Corona) जोर ओसरल्यानंतर राज्य सरकारने (Maharashtra Governemt) काही दिवसांपूर्वी सर्व निर्बंध शिथिल केले. मात्र सरकारने मास्क वापरणं ऐच्छिक ठेवलं होतं. मात्र आता पुन्हा मास्क वापरणं सक्तीचं होऊ शकतं, असं म्हंटल जात आहे. (in maharashtra may mask be forced again due to incrased corona in other state)
बंदिस्त ठिकाणी पुन्हा मास्कची सक्ती होणार का अशी शंका व्यक्त होतेय. अन्य राज्यांमध्ये वाढत असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टास्क फोर्सची बैठक घेण्यात आली. त्यावेळी टास्क फोर्समधील बहुतांश डॉक्टरांनी मास्कबाबत फेरविचार करण्याचा सल्ला मुख्यमंत्र्यांना दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
उद्या दुपारी पंतप्रधानांसोबत सर्व मुख्यमंत्र्यांची व्हीडिओ कॉनफरन्सिंगद्वारे चर्चा होणार आहे. दुपारी बारा वाजता पंतप्रधान आणि देशातील मुख्यमंत्री यांची व्हीसी माध्यमातून बैठक होणार आहे. त्यानंतर संध्याकाळी 7 वाजता मुख्यमंत्री सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.