मुंबई : महापालिकेत (Mumbai Municipal Corporation) भाजपच्या गटनेते (BJP Leader) पदावर विनोद मिश्रा तर विरोधी पक्षनेते (BJP Opposition Leader) म्हणून प्रभाकर शिंदे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. राज्यात शिवसेना (Shiv Sena) भाजप यांचा काडीमोड झाल्यानंतर भाजपने महापालिकेत विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आज भाजपाची बैठक झाली. या बैठकीत ही घोषणा करण्यात आली आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या बैठकीला विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, खासदार मनोज कोटक उपस्थित होते. यावेळी गटनेते म्हणून विनोद मिश्रा यांची नियुक्ती केली. विरोधी पक्ष नेते म्हणून प्रभाकर शिंदे यांचे नाव सूचवण्यात आले आहे. तर उपनेतेपदी उज्वला मोडक आणि रिटा मकवाना यांचं नाव घोषित करण्यात आले आहे.


मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेस नगरसेवक रवी राजा यांची निवड करण्यात आली आहे.  महापौरांनी  काँग्रेसचे गटनेते रवी राजा यांनी विरोधी पक्षनेत्याची निवड केल्याचे घोषीत केले होते. आता भाजप-शिवसेनेची युती तुटल्यानंतर भाजपने विरोध पक्षनेते पदावर दावा केला होता. त्यांनी आपला पालिकेतील गटनेता आणि विरोधी पक्ष नेता निवडला आहे. त्यामुळे नव्याने महापौर किशोरी पेडणेकर काय निर्णय घेणार याची उत्सुकता लागली आहे.


दरम्यान, भाजपकडून दाव्याचे पत्र गेल्यानंतर पुढील कार्यवाही होईल. तर दुसरीकडे उपमहापौर पदावर राष्ट्रवादी किंवा काँग्रेस दावा करु शकते, त्यामुळे उपमहापौर पदाचा तिढा वाढण्याची शक्यता आहे.


0