प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई : शिक्षकांना समाजात प्रतिष्ठेचा मान आहे. मात्र, गणिताच्या मास्तरने केला जन्मदात्या आईचाच हिशेब केला आहे. मुंबईच्या(Mumbai) जुहू(Juhu) परिसरात ही भयानक घटना घडली आहे. मृतदेह मात्र थेट माथेरानमध्ये(Matheran) सापडला आहे. मुंबई पोलिस या संपूर्ण घटनेचा गांभीर्याने तपास करत आहेत(Crime News). आरोपी शिक्षकाने बेसबॉल च्या बॅट ने मारहाण करून जन्मदात्या आईचा खून केला आहे.  मुंबईच्या जुहू येथील उच्चभ्रू सोसायटीत ही  धक्कादायक घटना घडली आहे. हत्या करणारा आरोपीने संपत्तीच्या वादातून आईची हत्या केल्याचे समोर येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हत्या केल्या नंतर आरोपीने आपल्या घरात घरकाम करणाऱ्या साथीदाराच्या मदतीने मृतदेह माथेरान येथे फेकून दिला.  या प्रकरणी जुहू पोलिसांनी सचिन कपूर आणि त्याला मदत करणारा छोटु उर्फ लालुकुमार मंडल याला अटक केली आहे.  सचिन कपूर हा एक गणित शिक्षक असून अविवाहित होता. तो आणि त्याची आई विना कपूर हे मुंबईतील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या उच्चभ्रू अशा कल्पतरू सोसायटी रहात होते. त्याचा भाऊ अमेरिकेत असून यांच्यात संपत्ती चा वाद न्यायालया पर्यंत पोहचला होता.  
अमेरिकेत राहणारा विना यांचा मुलगा नवीन हा वारंवार आपल्या आईला फोन करत होता. मात्र, आईचा फोन उचलला जात नव्हता. त्यामुळे त्याला शंका आली. यावर सोसायटीच्या सुरक्षा रक्षक सुपरवायझर ने जुहू पोलिसात विणा कपूर हरवल्याची तक्रार दिली. 


यावर जुहू पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी अधिक तपास सुरू केला असता. या प्रकरणात काहीतरी गडबड असल्याचे लक्षात आले.  पोलोसानी विणा यांचा शोध घेताना यांचा मुलगा सचिन कपूर यांच्याशी विचारणा केली आणि त्याला ताब्यात घेतले. 
पोलिसांच्या ताब्यात आल्यावर त्याने आपल्या आईची हत्या केल्याची कबुली दिली. संपत्तीच्या करणारवरून सचिनचे आणि आईचे भांडण झाले.  यात सचिनने घरातील बेसबॉलच्या बॅटने आपल्याच जन्मदात्या आईला बेदम मारले आणि आईची निर्घृण हत्या केला. 


तर, मृतदेह मोठ्या बॉक्स मध्ये भरून घरकाम करणाऱ्या छोटु उर्फ लालुकुमार मंडलला सोबत घेत माथेरान येथे दरीत मृतदेह फेकून दिला. पोलिसांनी माथेरान येथून मृतदेह ताब्यात घेतला असून दोघा आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास जुहू पोलीस करत आहे.