राज्यात पुन्हा थंडीचा कडाका, अनेक ठिकाणी तापमान १५ अंशांपर्यंत
आजपासून पुन्हा एकादा राज्यात थंडीचं पुनरागमन झालंय. मुंबईत काल रात्रीचं किमान तापमान 15 अंशांपर्यंत खाली आलं. दोन दिवसांपूर्वी कमाल तापमान 35 अशांपर्यंत चढलं होतं.
मुंबई : आजपासून पुन्हा एकादा राज्यात थंडीचं पुनरागमन झालंय. मुंबईत काल रात्रीचं किमान तापमान 15 अंशांपर्यंत खाली आलं. दोन दिवसांपूर्वी कमाल तापमान 35 अशांपर्यंत चढलं होतं.
सांगलीतील मिरज शहर परिसरात थंडीमुळे धुक्याची चादर पसरलीय.. धुक्यामुळे वाहतुकीवरही परिणाम झाला. उत्तरेत आलेल्या थंडीच्या लाटेचा परिणाम येत्या काही दिवसात राज्यातही दिसणार आहे.
दरम्यान, नाशिक जिल्ह्यामध्येही थंडीचा पारा घसरलाय. निफाड तालुक्यातल्या कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रामध्ये थंडीचा पारा ७ अंश सेल्सिअस इतका नोंदवला गेलाय. गेल्या वर्षी २०१७ मध्ये थंडीचा पारा ६ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला होता. या वर्षी २०१८ चे ७ अंश सेल्सिअस हे सर्वात निचांकी तापमान आहे.