मुंबई : देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर काही प्रमाणात ओसरला आहे. मात्र कोरोना अजूनही नियंत्रणात आलेला नाही. राज्यात दररोज 10 पेक्षा कमी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचं निदान होतं आहे. मात्र तरीही राज्यासाठी एक चिंताजनक बाब आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांपैकी 10 जिल्ह्यांमध्ये कोरोनाची तब्बल 93 टक्के इतकी रुग्णसंख्या आहे. (In these 10 districts of Maharashtra corona rate is 93 percent)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण? 


सर्वाधिक रुग्णांच्या बाबतीत पश्चिम महाराष्ट्र आघाडीवर आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर आणि पुणे या जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण आहे. त्यानंतर कोकणातील मुंबई,  ठाणे आणि रायगडमध्येही कोरोना नियंत्रणात नाही. तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि अहमदनगरमध्ये कोरोनाचा जोर ओसरताना दिसत नाहीये. त्यामुळे या जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवण्याचं आव्हान आरोग्य यंत्रणेसमोर आहे.  


महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी


कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी देशात अजूनही कोरोना रुग्ण वाढतायत. यात पाच राज्यांत सर्वाधिक रुग्णवाढ होतेय. त्यात पहिल्या स्थानी केरळ आहे. तर महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी आहे. केरळात 30%रुग्ण आहेत तर महाराष्ट्रात 20%रुग्ण आहेत. त्या खालोखाल तामिळनाडूत 8.5%, आंध्रात 7.3% आणि ओडिशात 6.5% रुग्ण आहेत. 


केंद्र सरकारकडून राज्यांसाठी ऍडवायजरी 


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्यांसाठी ऍडवायजरी जाहीर केली आहे. त्यानुसार कोरोना नियमांचं उल्लंघन केल्यास कडक कारवाई केली जाणार आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी 5 स्तरीय कार्यक्रम देण्यात आला आहे. यामध्ये टेस्ट, ट्रॅक, ट्रिटमेंट, व्हॅक्सिनेशन आणि कोरोना प्रोटोकॉल म्हणजेच नियम पालन यांचा समावेश आहे. गर्दी होणा-या ठिकाणी विशेष लक्ष देण्याच्या सूचना करण्यात आल्यात.