आयकर विभाग तुमचे फेसबुक, इन्स्टाग्रामचे फोटो पाहणार
नवीन कार, परदेशात भटकंती याचे फोटो पाहिल्यानंतर ही पडताळणी होण्याची शक्यता आहे.
मुंबई : आयकर विभाग आता तुमच्या फेसबुक आणि इन्स्ट्राग्रामवरील फोटो पाहणार आहे, यात परदेशातली भटकंती असेल, तर तुम्ही अडचणीत येऊ शकतात. नवीन कार, परदेशात भटकंती याचे फोटो पाहिल्यानंतर ही पडताळणी होण्याची शक्यता आहे.
एवढंच नाही आयकरवाल्यांनी यावर ७ वर्षात १ हजार कोटी रूपये खर्च करून, प्रोजेक्ट इन्साइट' राबवला आहे.
हा जगातील सर्वात मोठा बायोमेट्रीक डाटाबेस तयार करण्यात आला आहे, प्रणालीच्या विकासासाठी एल अँड टी इन्फोटेक लिमिटेडची मदत घेण्यात आली आहे.
सर्वात महत्वाचे म्हणजे दागिने, नवीन कार, घर किंवा परदेश दौऱ्यांच्या फोटोंवरही, एका टीमकडून नजर ठेवली जाणार आहे.
मोदी सरकारच्या कार्यकाळात बँक आणि पॅन कार्ड आधारशी जोडल्यानंतर, आता प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांना सोशल मीडियावरही नजर ठेवता येणार आहे.
यात एक महत्वाचं म्हणजे, वार्षिक उत्पन्न, खर्च याचा ताळमेळ बसला नाही, तर तुमची चौकशी होणार आहे. तसेच सर्वसामान्यांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन होणार नाही, याची देखील काळजी घेतली जाणार आहे.
प्रत्येकाच्या मागे चौकशीची कटकट लागणार नसेल असंही सांगण्यात येत आहे, घरात छापा न टाकता सर्व माहिती मिळेल असा विश्वास आयकर खात्याला आहे.