मुंबई : Income tax notice : मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना इन्कम टॅक्स खात्याने नोटीस बजावली आहे. शिवसेनेचे मोठे नेते यशवंत जाधव प्रकरणी चौकशीसाठी हे समन्स बजावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. (Income tax notice to Mumbai Commissioner Iqbal Singh Chahal)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, गेल्या 3 मार्च रोजीच महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना ही नोटीस बजावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावरील कारवाईसंदर्भात ही नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


महापालिका आयुक्तांना आयकर विभागाने समन्स बजावल्याने मोठी चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान, इक्बालसिंह चहल यांना 3 मार्चला नोटीस बजावली आहे. यशवंत जाधव प्रकरणी चौकशीसाठी समन्स 10 मार्चला हजर राहण्यासाठी हे समन्स पाठवले होते.


चहल यांना का पाठवली नोटीस



एप्रिल 2018 ते मार्च 2022 पर्यंत स्थायी समितीने जे-जे कॉन्ट्रॅक्ट दिले गेले, जे ठराव पास झाले त्याची सर्व कागदपत्रे घेऊन आयकर विभागाने या आधीच आयुक्त चहल यांना बोलावले होते. आता पुन्हा एकदा यासंबंधी त्यांना बोलावण्यात आले आहे. या चार वर्षांमध्ये जे काही कॉन्ट्रॅक्ट्स देण्यात आले.  त्या सगळ्यामध्ये गैरव्यवहार झाला असल्याचा संशय हा आयकर विभागाला आहे.