मध्ये रेल्वकडून उन्हाळी विशेष ट्रेनच्या सेवांमध्ये वाढ; जाणून घ्या सविस्तर
राज्यातील प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने उन्हाळी विशेष ट्रेन्सची व्यवस्था केली आहे.
मुंबई : राज्यातील प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने उन्हाळी विशेष ट्रेन्सची व्यवस्था केली आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने सुधारित संरचनेसह पुढील उन्हाळी विशेष गाड्यांची मुदत वाढविण्याचे ठरविले आहे.
अ. पुणे येथून/पर्यंत विशेष ट्रेनचा विस्तार:
१. 01329/01330 पुणे - गोरखपूर विशेष
01329 पुणे - गोरखपूर विशेष सेवा दि. २२.५.२०२१, २५.५.२०२१, २७.५.२०२१ आणि २९.५.२०२१ (४ फे-या) रोजी वाढविण्यात आल्या आहेत तसेच
01330 गोरखपूर - पुणे विशेष दि. २४.५.२०२१, २७.५.२०२१, २९.५.२०२१ आणि ३१.५.२०२१ (४ फे-या) रोजी वाढविण्यात आल्या आहेत.
२. 01331/01332 पुणे - दानापूर विशेष
01331 पुणे - दानापूर विशेष सेवा दि. २१.५.२०२१, २४.५.२०२१, २८.५.२०२१ आणि ३१.५.२०२१ (४ फे-या) रोजी वाढविण्यात आल्या आहेत तसेच
01332 दानापूर-पुणे विशेष अतिजलद सेवा दि. २२.५.२०२१, २५.५.२०२१, २९.५.२०२१ आणि १.६.२०२१ (४ फे-या) रोजी वाढविण्यात आल्या आहेत.
३. 01333/01334 पुणे - दरभंगा विशेष
01333 पुणे - दरभंगा विशेष सेवा दि. २७.५.२०२१ (१ फेरी) रोजी वाढविण्यात आली आहे आणि
01334 दरभंगा-पुणे विशेष सेवा दि. २९.५.२०२१ (१ फेरी) रोजी वाढविण्यात आली आहे.
४. 01335/01336 पुणे - भागलपूर विशेष
01335 पुणे - भागलपूर विशेष सेवा दि. २३.५.२०२१ व ३०.५.२०२१ (२ फे-या) रोजी आणि
01336 भागलपूर - पुणे विशेष सेवा दि. २५.५.२०२१ व १.६.२०२१ (२ फे-या) रोजी वाढविण्यात आल्या आहेत.
सुधारित संरचनाः क्रमांक १ ते ४ मधील उपरोक्त सर्व विशेष सेवा २ तृतीय वातानुकूलित, ११ शयनयान, ६ द्वितीय आसन श्रेणीसह.
ब. मुंबई येथून/ पर्यंत विशेष ट्रेनचा विस्तार.
५. 01359/01360 मुंबई - गोरखपूर विशेष
01359 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई - गोरखपूर विशेष सेवा दि. २१.५.२०२१, २३.५.२०२१, २४.५.२०२१, २६.५.२०२१, २८.५.२०२१, ३०.५.२०२१ आणि ३१.५.२०२१ (७ फे-या) रोजी वाढविण्यात आल्या आहेत तसेच
01360 गोरखपूर - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई विशेष सेवा दि. २३.५.२०२१, २५.५.२०२१, २६.५.२०२१, २८.५.२०२१, ३०.५.२०२१, १.६.२०२१ आणि २.६.२०२१ (७ फे-या) रोजी वाढविण्यात आल्या आहेत.
६. 01361/01362 मुंबई - दानापूर विशेष अतिजलद
01361 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई -दानापूर विशेष अतिजलद सेवा दि. २७.५.२०२१ (१ फेरी) रोजी आणि
01362 दानापूर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई विशेष अतिजलद सेवा दि. २८ .५.२०२१ (१ फेरी) रोजी वाढविण्यात आली आहे.
७. 01363/01364 मुंबई - दरभंगा विशेष
01363 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई - दरभंगा विशेष सेवा दि. २५.५.२०२१ (१ फेरी) रोजी आणि
01364 दरभंगा- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई विशेष सेवा दि. २७.५.२०२१ (१ फेरी) रोजी वाढविण्यात आली आहे.
८. 01365/01366 मुंबई - छपरा विशेष
01365 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई - छपरा विशेष सेवा दि. २२.५.२०२१ आणि २९.५.२०२१ (२ फे-या) रोजी वाढविण्यात आल्या आहेत आणि
01366 छपरा - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई विशेष सेवा दि. २४.५.२०२१ आणि ३१.५.२०२१ (२ फे-या) रोजी वाढविण्यात आल्या आहेत.
सुधारित संरचनाः क्रमांक ५ ते ८ मधील उपरोक्त सर्व विशेष सेवा ४ तृतीय वातानुकूलित, १० शयनयान, ७ द्वितीय आसन श्रेणीसह.
उपरोक्त सर्व विशेष सेवा विद्यमान मार्गावर, वेळापत्रकाप्रमाणे आणि थांब्यांसह धावतील.
आरक्षण : मुंबई व पुणे येथूंन सुटणाऱ्या व पूर्णतः आरक्षित असलेल्या विशेष ट्रेनच्या वाढीव सेवांचे विशेष शुल्कासह बुकिंग सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर व www.irctc.co.in. या संकेतस्थळावर आधीच सुरू झालेले आहे.
तपशीलवार वेळ आणि थांब्यासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस अॅप डाउनलोड करा.
केवळ कन्फर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल.
प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-१९शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.