नवी दिल्ली : भारत चीनला आणखी एक धक्का देणार आहे.  भारताने 59 चायनीज ऍप्सवर कायमची बंदी घालण्याची तयारी केलीय.भारत सरकारने सात महिन्यांपूर्वी 59 चिनी ऍप्सना कारणे दाखवा नोटीस पाठवली होती. आता या ऍप्सना कायमचं बंद करण्यासाठी सरकारनं नवीन नोटीस पाठवली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नोटिसीवर कंपन्यांनी दिलेलं उत्तर पुरेसं नसल्यामुळे आता सरकार या ऍप्सवर कायमची बंदी घालण्याच्या तयारीत आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये भारत सरकारने 59 चिनी ऍप्सवर बंदी घातली होती. सरकारने ज्या कंपन्यांवर बंदी घातली त्यामध्ये TikTok, Helo App, Vchat, अलिबाबा, UC Brouser आणि यूसी न्यूज, शीन, क्लब फॅक्टरी, लाइक, बिगो लाइव्ह, क्लॅश ऑफ किंग्ज आणि कॅम स्कॅनर अशा विविध ऍप्सचा समावेश आहे.


भारत सरकारने 2 सप्टेंबर रोजी 118 Apps वर बंदी घातली होती. नोव्हेंबरमध्ये आणखी 43 चिनी ऍप्सवर बंदी घालण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. यावळे बंदी घालण्यात आलेल्या ऍप्समध्ये अली एक्सप्रेस सारख्या ऍप्सचा देखील समावेश होता. 



या व्यतिरिक्त पब्जी मोबाइल गेम, स्नॅक व्हिडिओ, कॅमकॉर्ड, वी वर्क चाइना आणि वीडेट आदी ऍप्सवर देखील बंदी घालण्यात आली होती. आर्थिक बाजूनं चीनची कोंडी करण्यासाठी भारत सरकारनं चीनी ऍप्सवर बंदी घातली आहे.