Indian Workers For Israel Construction Work: हमाससोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान पायाभूत सुविधा आणि आरोग्य सेवेतील कौशल्याची कमतरता दूर करण्यासाठी इस्रायल (Israel) भारतातून 10,000 बांधकाम कामगार (Construction) आणि 5,000 काळजीवाहकांची (Health Services) नियुक्ती करणार आहे. पायाभूत सुविधा आणि आरोग्य क्षेत्रात नोकरी शोधणाऱ्यांना नोकऱ्या देण्यासाठी इस्रायलने भारताशी संपर्क साधला आहे. इस्रायलला 10 हजार बांधकाम कामगार आणि 5 हजार आरोग्य सेवा कामगारांची गरज आहे. येत्या आठवड्यात इस्रायली कंपन्यांचे पथक भारताला भेट देणार असल्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या भरती मोहिमेची दुसरी फेरी महाराष्ट्रात आयोजित केली जाणार आहे. इस्त्रायलमध्ये सध्या कामगारांचा प्रचंड तुटवडा आहे. काही क्षेत्रात त्यांना कामगारांची प्रचंड आवश्यकता आहे. ज्यामध्ये फ्रेमवर्क, लोखंडी वेल्डिंग, प्लॅस्टिकिंग आणि सिरॅमिक टाइलिंगचे काम करणाऱ्यांची मागणी करण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत इस्रायली कंपन्या भारताला भेट देतील आणि त्यांच्या निकषांवर आणि कौशल्यांवर आधारित कुशल कामगारांची निवड केली जाईल.


याशिवाय आरोग्य विभागातील कामगारांचीही इस्त्रायलला गरज आहे. यासाठी पाच हजार कामगारांची मागणी करण्यात आली आहे. ज्या लोकांनी किमान 10 वी पूर्ण केली आहे किंवा एखाद्या मान्यताप्राप्त भारतीय संस्थेने जारी केलेलं प्रमाणपत्र किंवा किमान 990 तासांच्या नोकरीच्या प्रशिक्षणासह नर्सिंग कोर्स पूर्ण केला आहे असे उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात.


निवड झालेल्या उमेदवारांना मिळणार या सुविधा


इस्त्रायलसाठी निवड झालेल्या उमदेवारांना वैद्यकिय विमा, राहण्याची आणि खाण्याची सुविधा, आणि 1.92 लाख रुपयांपर्यंत महिना पगार दिला जाणार असल्याची माहिती इस्त्रालय सीमा प्राधिकरणाने दिली आहे. याशिवाय निवड झालेल्या उमेदवारांना दर महिना 16,515 रुपयांचा बोनसही दिला जाणार आहे. इस्रायलमध्ये बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या भरतीच्या पहिल्या फेरीत एकूण 16832 उमेदवारांनी चाचणी दिली होती. त्यापैकी 10349 उमेदवारांची निवड करण्यात आली होती.


भरतीच्या पहिल्या फेरीत उत्तर प्रदेश, हरियाणआ आणि तेलंगणा राज्यातील कामगारांचा समावेश होता. नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NSDC) ने नोव्हेंबर 2023 मध्ये सरकारबरोबर (G2G) करारावर स्वाक्षरी केल्यानंतर कामगारांची भरती करण्यासाठी भारतातील राज्यांशी संपर्क साधला होता.


इस्त्रायली संस्कृतीशी ओळख


इस्त्रायलसाठी निवड झालेल्या उमेदवारांना तिथे जाण्याआधी प्रशिक्षण दिलं जाणार आहे. यात इस्त्रायली संस्कृती, तिथली जीवन शैली यांची ओळख करुन दिली जाणार आहे. तसंच नव्या घरात राहाण्यासाठी नियमांचही पालन करावं लागणार आहे.