भारतीय नौदल हेलिकॉप्टरला मोठा अपघात, मुंबईच्या किनार्यावर कोसळले
Indian Navy helicopter crashed in Mumbai : भारतीय नौदलाचे हेलिकॉप्टर मोठा अपघात झाला आहे. नौदलाचे हेलिकॉप्टर मुंबईतील समुद्र किनाऱ्यावर हेलिकॉप्टर कोसळून अपघातग्रस्त झाले आहे. (Helicopter crashed Near Mumbai Coast) दरम्यान, या हेलिकॉप्टर अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. अपघाताचे नेकमे कारण समजू शकलेले नाही.
Indian Navy Helicopter Crashed in Mumbai : भारतीय नौदलाचे अत्याधुनिक हलके हेलिकॉप्टरला बुधवारी मुंबई किनार्यावर नियमित उड्डाण करत असताना अपघात झाला. (Helicopter crashed Near Mumbai Coast) नौदलाचे हेलिकॉप्टर मुंबईत कोसळल्याने मोठे नुकसान झाले आहे. या अपघातातून नौदलाच्या तीन जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे. हेलिकॉप्टरल कशामुळे अपघात झाले हे समजू शकलेले नाही. दरम्यान, हेलिकॉप्टर अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. (Indian Navy Helicopter crashed Near Mumbai Coast; All Crew Members Safely Rescued)
हेलिकॉप्टर अपघाताच्या चौकशीचे आदेश
भारतीय नौदलाचे एएलएच मुंबईपासून नियमित उड्डाण करत असताना किनाऱ्याजवळ अपघात झाला. समुद्र किनाऱ्यावर हेलिकॉप्टरला अपघात झाल्यानंतर तात्काळ शोध आणि बचावकार्य हाती घेण्यात आले. नौदलाच्या पेट्रोलिंग क्राफ्टने त्वरित शोध आणि बचाव सुरु केला. नौदलाच्या गस्ती क्राफ्टद्वारे तीन जणांच्या क्रूला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले. या घटनेच्या आणि अपघाताचे कारण शोधण्यासाठी भारतीय नौदलाने घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.
भारतीय नौदल हेलिकॉप्टरला मोठा अपघात झाला आहे. मुंबईपासून नियमित उड्डाण करत असताना किनाऱ्याजवळ हे हेलिकॉप्टर कोसळे असून त्याचा तात्काळ शोध आणि बचावामुळे नौदलाच्या गस्ती क्राफ्टद्वारे तीन जणांच्या क्रूला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले. भारतीय नौदलाने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत, असे वृत्त वृत्तसंस्था एएनआयने दिले आहे.
हेलिकॉप्टरमधील पायलटसह चालक दलातील तीनही सदस्यांना नौदलाच्या गस्ती पथकाने वाचवले आहे. “एएलएच नियमित उड्डाण करत होते जेव्हा ते मुंबईच्या किनाऱ्याजवळ आले असता कोसळले. या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आल्याची माहिती वेस्टर्न नेव्हल कमांडच्या एका अधिकाऱ्याने दिली.