मुंबई : भारतीय सागरी सीमांचं रक्षण करणाऱ्या तटरक्षक दलाच्या जवानांनी जीवाची बाजी लावून एका जर्मन पर्यटकाला जीवदान दिलंय. कुंद्रान एंटन नावाचे 75 वर्षीय जर्मन पर्यटक मुंबई-कोलंबो हा सागरी प्रवास करत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्रवासादरम्यान गोव्याच्या समुद्रात असताना कुंद्रान यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्याचवेळी घटनेचे गांभीर्य ओळखून कुंद्रान यांच्या मदतीसाठी भारतीय तटरक्षक दलाचे जवान धावून आले.


कुंद्रान यांच्यासाठी तटरक्षक दलाने विशेष ऑपरेशन राबवलं



या ऑपरेशनच्या माध्यमातून कुंद्रान यांना जहाजातून तटरक्षक दलाच्या विशेष हेलिकॉप्टरने हॉस्पिटलला हलवण्यात आलं. वेळीच उपचार मिळाल्याने कुंद्रान यांचे प्राण वाचले आहेत. त्यामुळे भारतीय तटरक्षक दलाचे जवान कुंद्रान यांच्यासाठी जणू देवदूत बनून धावून आले.