Indian Railway : प्रवाशांना सातत्यानं चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करत आणि त्यांचा प्रवास सुकर कसा होईल यावर भर देत भारतीय रेल्वे कायमच काही मोठे निर्णय घेत असते. अनेकदा त्या निर्णयांचा गाजावाजा होत नसला तरीही त्याचे परिणामच निर्णय किती योग्य होता याची प्रचिती देत असतात. अशा या रेल्वे विभागामुळं आता गावाकडे निघणाऱ्या आणि लांब पल्ल्याच्या प्रवासाला निघणाऱ्या प्रवाशांना फायदा होणार आहे. कारण, आता या प्रवासात त्यांचा फार वेळ दवडला जाणार नाही. 


रेल्वेनं केलंय एक कमाल काम... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्य रेल्वेकडून वर्धा- बडनेरा विभागात 95.44 रेल्वे रुळांचं विस्तारीकरण, ओव्हरहेड वायर यंत्रणेच्या नियमनाचं काम, सिग्नल आणि इतर काही पायाभूत सुविधा उभारण्याचं काम हाती घेतलं होतं. आता हे काम पूर्ण झालं असून, परिणामस्वरुप अनेक रेल्वे गाड्यांचे वेग वाढणार आहेत. सीएसएमटी - हजरत निजामुद्दीन सह जवळपास 30 रेल्वे गाड्यांचा वेग यामुळं वाढून आता या रेल्वे ताशी 130 किमी वेगानं धावतील. थोडक्यात रेल्वेप्रवासासाठी लागणारा वेळ कमी होणार असून, प्रवाशांना याचा थेट फायदा होणार आहे. 


हेसुद्धा वाचा : विठ्ठलाला तुळस का वाहतात? जाणून घ्या यामागचं कारण 


 


कोणकोणत्या रेल्वे गाड्यांचा वाढणार वेग? 


सीएसएमटी - हजरत निजामुद्दीन- सीएसएमटी राजधानी एक्स्र्पेस 
सीएसएमटी - अमरावती- सीएसएमटी 
सीएसएमटी - नागपूर- सीएसएमटी 
हावडा - सीएसएमटी- हावडा 
सीएसएमटी - गोंदिया- सीएसएमटी 
सीएसएमटी - हावडा - सीएसएमटी 
एलटीटी- हटिया- एलटीटी 
एलटीटी- विशाखापट्टणम- एलटीटी 
एलटीटी- पुरी- एलटीटी 
एलटीटी- भुवनेश्वर- एलटीटी 
सीएसएमटी - हावडा- सीएसएमटी गीतांजली एक्स्र्पेस 
पुणे- संत्रागाची- पुणे 
एलटीटी- कामाख्या- एलटीटी
सीएसएमटी - हावडा- सीएसएमटी दुरांतो
गोंदिया- सीएसएमटी - गोंदिया विदर्भ एक्स्प्रेस 
नागपूर- सीएसएमटी - नागपूर दुरांतो एक्स्प्रेस 
एलटीटी- शालीमार- एलटीटी ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस 
एलटीटी - शालीमार- एलटीटी समरसता एक्स्प्रेस