Mumbai Local Train Latest Update : नोकरीच्या निमित्तानं दूरवरून लोकलनं प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे. मध्य, पश्चिम आणि उपनगरीय (Central, Western and Harbour Railway) रेल्वे सेवांचा उपभोग घेणाऱ्यांपैकी तुम्हीही असाल. अपेक्षित ठिकाणी, अपेक्षित वेळेत पोहोचण्यासाठी तुम्हीही दर दिवशी धडपड करत असाल. अशा या (Mumbai News) मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या Mumbai Local बाबतची मोठी बातमी नुकतीच समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नव्या माहितीनुसार लोकलच्या वेळापत्रकांत काही मोठे बदल करण्यात आल्यामुळं याचे थेट परिणाम प्रवाशांवर आणि लोकलनं रोजचा प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांवर होताना दिसणार आहे. मध्य रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांना या बदलांचा फटका बसणार आहे. (Indian Railway Mumbai Local Karjat Khopoli train cancelled read details) 


मध्य रेल्वेच्या लोकल फेऱ्या रद्द? 


कर्जत यार्डमध्ये (Karjat Local) काही महत्त्वाचे बदल आणि आवश्यक कामं पूर्णत्वास नेण्यासाठी मध्य रेल्वेच्या वतीनं कर्जत ते खोपेली घाट या अंतरादरम्यान तीन दिवसांचा (Railway Block) ब्लॉक घोषित केला आहे. मुळातच या मार्गावर लोकलच्या फेऱ्यांची संख्या कमी आहे. त्यातच आता कामं मार्गी लावण्यासाठी घेण्यात येणाऱ्या ब्लॉकचेही थेट परिणाम प्रवाशांना सोसावे लागणार आहेत. 


बुधवारपासून तीन दिवस हा ब्लॉक असेल. या कालावधीत दोन लोकल (Mumbai Local Train Updates) रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 12 ते 14 एप्रिल 2023 या कालावधीत असणाऱ्या या ब्लॉकमध्ये सकाळी 10.50 ते 3.45 या वेळेत हा विशेष ब्लॉक लागू असेल. परिणामी या वेळेत दुपारी 1.15 मिनिटांनी निघणारी कर्जत- खोपोली आणि त्यामागोमाग 2.55 वाजता निघणारी खोपोली- कर्जत लोकल रद्द करण्यात आली आहे याची प्रवाशांनी नोंद घ्यावी. 


हेसुद्धा पाहा : Crime News: गर्दीने खचाखच भरलेल्या विरार रेल्वे स्थानकात घडली धक्कायक घटना; सर्व ट्रेन खोळंबल्या


 


CSMT अर्थात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दुपारी 12 वाजून 20 मिनिटांनी सुटणारी खोपोली (Khopoli) लोकल कर्जतपर्यंतच जाईल. याशिवाय कर्जत ते खोपोली घाट मार्गादरम्यान असणाऱ्या ब्लॉकमुळं खोपोलीतून दुपारी 1.48 ला निघणारी CSMT लोकल कर्जतवरून सुटेल याचीही प्रवाशांनी दखल घ्यावी. 


दरम्यान लोकलच्या फेऱ्यांमध्ये केलेले बदल पाहता याचा कार्यालयीन वेळांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर होणारा परिणाम कमी असला तरीही एकंदरच रेल्वे वेळापत्रकावर याचे थोडेथोडके परिणाम दिसून येणार आहेत. त्यामुळं काही अंशी लोकल काही मिनिटे उशिराही धावण्याची अपेक्षा आहे.