मुंबई : बातमी समोशाची. भारतीय लोकांचा अत्यंत आवडता हा पदार्थ आता इंग्लंड गाजवायला सज्ज झाला आहे. गरमागरम आणि खमंग समोसा आता इंग्लंडवासीयांची भूक भागवणार आहे. भारतीय लोकांचा आवडता असणारा हा समोसा, आता इंग्लंडमध्ये दिसणार आहे. बटाटा, त्याच्याबरोबर कधी वाटाणे, कधी कांदा आणि खूप सारा मसाला असं तोंडाला पाणी सुटणारे जिन्नस एकत्र येतात. मैद्याच्या आवरणात त्यांची त्रिकोणी पुडी बांधली जाते आणि ती तेलात खमंग तळली की तयार होतो गरमागरम समोसा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


आता परदेशी नागरिकांचाही फेवरेट होणार आहे. इंग्लंडच्या लेस्टर शहरात समोसा वीक साजरा केला जाणार आहे. 9 ते 13 एप्रिल दरम्यान इंग्लंडमधल्या खवय्यांना या समोशाचा आस्वाद घेता येणार आहे. दक्षिण आशियातल्या खाद्यपदार्थांना प्रोत्साहन देण्यासाठी या समोसा वीकचं आयोजन करण्यात आलंय. 


मुघलांनी भारतात समोसा आणला असं सांगितलं जातं. भारतीयांनी खुल्या दिलानं त्याचं स्वागत केलं. या समोशानं सगळ्या भारताला एकतेच्या सूत्रात बांधलंय. समोसा मस्तही आणि स्वस्तही आणि पोटभरही. हाच समोसा आता इंग्लंडमध्येही लोकप्रिय होईल, असा अंदाज आहे. 



 इंग्लंडमधल्या या समोसा वीकचं आयोजन केलंय 'लेस्टर करी अवॉर्ड'नं. लेस्टर करी अवॉर्डची रोमिला गुलजार ही सामोशाची प्रचंड चाहती. जर जगात बर्गर डे साजरा होऊ शकतो, तर समोसा वीक का नाही, असं तिचं म्हणणं आहे. म्हणूनच तिनं या समोसा वीकचं आयोजन केलंय. इंग्लंडच्या खवय्यांची भूक भागवायला आता समोसा सज्ज झालाय.