मुंबई : शीना बोरा हत्याकांडातील आरोपी इंद्राणी मुखर्जीला शुक्रवारी रात्री जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या अडीच वर्षांपासून इंद्राणी तुरुंगात आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंद्राणीची प्रकृती अचानक बिघडल्यानंतर कारागृह प्रशासकाने तिला तातडीनं जेजे रुग्णालयात दाखल केले.तिच्या प्रकृतीत झालेल्या बिघाडाचे नेमके कारण आणि तिने कुठल्या गोळ्यांचे सेवन केले आहे का हे शोधण्यासाठी वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या आहेत. 



सध्या तिची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती जेजे रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली आहे.


काय आहे नेमके प्रकरण?


 २४ एप्रिल २०१२ रोजी शीनाची हत्या करण्यात आली. ऑगस्ट २०१५ मध्ये इंद्राणीला शीनाच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली. इंद्राणी, संजीव खन्ना आणि पीटर मुखर्जी यांच्यावर विशेष सीबीआय न्यायालयाने शीनाच्या हत्येचा कट रचून तिची हत्या केल्याचा आरोप निश्चित केला आहे. तसेच याशिवाय तिघांवर तिचे अपहरण करणे, त्यानंतर तिची हत्या करणे, गुन्ह्याबाबत खोटी माहिती देऊन दिशाभूल करणे आणि पुराव्यांची विल्हेवाट लावणे, असे मुख्य आरोप ठेवण्यात आले आहेत. तसेच शीनाचा भाऊ मिखाईल याच्या हत्येचा प्रयत्न करण्याचा कट रचल्याचा आरोपही ठेवण्यात आलाय.