मुंबई : हभप इंदुरीकर महाराज आपल्या कीर्तनातील एका वाक्यामुळे चर्चेत आले आहेत. तसे इंदुरीकर महाराज महाराष्ट्रात माहित नाहीत, असा मराठी माणूस शोधूनही सापडणार नाही. सोशल मीडियावर इंदुरीकरांना ऐकणारे कोट्यवधीच्या घरात आहेत. इंदुरीकरांनी आपल्या कीर्तनातून सर्वांनाच झोडपून काढलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंदुरीकरांनी मीडियावाल्यांनाही सोडलेलं नाही. इंदुरीकरांनी पेपरमध्ये कशा बातम्या येतात याची दोन उदाहरणं काही दिवसापूर्वी दिली होती. 


यात इंदुरीकरांनी आपली कीर्तनाची बातमी कोपऱ्यात लागते असे ताशेरे ओढले होते, पण आज जेव्हा इंदुरीकर हेडलाईनला आले आहेत, तेव्हा त्यांना कीर्तन सोडावंस वाटतंय.


अर्थात इंदुरीकरांनी कीर्तन सोडू नये, अशी बहुतांश लोकांची अपेक्षा असेल. इंदुरीकरांनी एका किर्तनात पेपरवाल्यांची बातमी कशी असते त्याची दोन मजेदार उदाहरणं दिली आहेत. ती नक्की वाचा.


पेपरमधली बातमी .... पहिलं उदाहरण


इंदुरीकर म्हणतात.... दोन बातम्यांचे नमुने सांगतो...दोन...बातम्या लई भारी असतात..


इंदुरीकरांचे बीडला कीर्तन झाले... एकदम कोपऱ्यात बातमी.


शोधावा लागतो तिकडे इंदुरीकर होता की नाही.


पाशवी बलात्कार पहिल्या पानावर


पंप लूटला हेडिंगला


तांदुळ गुरूजींच्या घरी सापडला पहिल्या पानावर


अंगणवाडीची बाई घुगऱ्या विकून आली...


कॉन्ट्रॅक्टरच्या अंगणात खडी सापडली, करा चौकशी...


रात्रीत खडी गायब...


आमच्या सारख्याचं कीर्तन लोकांना पटत नाही...


लोकांना खरं नको..!


पेपरमधली बातमी .... इंदुरीकरांनी सांगितलेलं दुसरं उदाहरण


बसलो आपण पेपर वाचीत, पेपरात लिहलंय...पुढील तपास चालू आहे, पुढील तपास चालू आहे, तपासंच काय चालूंय काही कळंना, तुम्ही पेपर वाचा रोज, पेपरात रोज हाच दणका...पुढील तपास चालू आहे...पुढील तपास चालू आहे...


पेपरात दोन चार बातम्या लई भारी राहत्यात


ऊसाला योग्य भाव देणार... हेडिंग.... 


म्हणलंय कोण मुख्यमंत्री...ऊसाला योग्य भाव देणार -मुख्यमंत्री हे झालं मोठ्या अक्षरात


खाली कुठून पडलीय बातमी... बीड. कंसात बीड वार्ताहर. 


खालची ओळ पाहिली का, ऊसाला योग्य भाव देणार - वरील उद्गार मुख्यमंत्र्यांनी बीडमधील आयोजित कार्यक्रमात काढले. 


सदर कार्यक्रमास खालील मान्यवर उपस्थित होते, साडेसातशे नावं खाली.


काय लबाड्या आहेत तुम्हाला सांगतो, त्यात मनपावाल्यांचं नाव नाही..


काय दिवस आले हो, आणि त्यांच्यातले निम्मे गैरहजर...तरी हजर होते आणि खाली टीप बहुसंख्यने समाज हजर होता. 


मग हे समाजाचे बाहेरचे होते का? बातमी पेक्षा नावं जास्त लागत होती.


बातमी विस्तृत लागत नव्हती, मग नावाला किंमत देण्याची काय गरज होती, मग कार्यक्रम तुमच्यापर्यंतच ठेवायचा होता ना.