मुंबई : हभप इंदुरीकर महाराज देशमुख यांचं लोकसभा निवडणूक स्पेशल कीर्तन व्हायरल झालं आहे. इंदुरीकर महाराज यांचं तिखट बोलणं अनेकांना झोंबतं. पण यावर इंदुरीकर म्हणतात. माझं कीर्तन आजही सत्य आहे, आणि उद्या देखील सत्य आहे. तो कानाला कडवट नक्की वाटेल. (कीर्तनाचा व्हिडीओ बातमीत पाहा) पण वास्तव असल्याचं इंदुरीकर म्हणतात. इंदुरीकर महाराज यांचं आडनाव देशमुख आहे. पण आज काल पाटील, स्वत:कडे हात दाखवत काही देशमुख देखील पैसे घेऊन मतदान घेतात, असं उपहासात्मक उदाहरण दिलं. माझं कीर्तन महाराज म्हणून ऐकू नका, मुलगा आणि मित्र म्हणून ऐका, असं देखील यावेळी इंदुरीकर यांनी यावेळी सांगितलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


इंदुरीकर महाराज यांनी लोकसभा निवडणुकीसाठी १०० टक्के मतदान करण्याच आवाहन केलं. पण मतदान करण्यासाठी पैसे घेण्याची जी प्रवृत्ती वाढत चालली आहे, यावर इंदुरीकर महाराज यांनी खरमरीत शब्दात टीका केली आहे. इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनावर टीका देखील होते, तर दुसरीकडे इंदुरीकर महाराज यांचं कीर्तन मला आवडतं असं म्हणणारा वर्ग देखील मोठा आहे.


देशात कमी मतदान होतं हे वाईट आहे, मतदान १०० टक्के करा, आणि तुम्हाला कोणताही उमेदवार योग्य वाटत नसेल, तर नोटाचा पर्याय वापरा हा देखील सल्ला यावेळी इंदुरीकर यांनी दिला आहे.