मुंबई : हभप इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनाचा गाजावाजा सोशल मीडियावर आहे. अख्खा महाराष्ट्र इंदुरीकरांना यूट्यूबवर ऐकतोय. इंदुरीकर बहुतांश लोकांना भावतात. इंदुरीकर यांना त्याचं दमावर काहींनी आता, प्रबोधनकार इंदुरीकर म्हणायला सुरूवात केली आहे. इंदुरीकर यांना यूट्यूबवर कोट्यवधी लोकांनी ऐकलंय. तरूण-तरूणींमध्ये देखील इंदुरीकरांची क्रेझ आहे. ( इंदुरीकर कीर्तनासाठी किती पैसे घेतात, बातमीतील खालील व्हिडीओत ऐका.)


इंदुरीकरांची तेरावी स्कार्पिओ


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपण कीर्तनासाठी किती पैसे घेतो याचं उत्तर देखील हभप इंदुरीकरांनी आपल्या कीर्तनातून दिलं, इंदुरीकर म्हणतात, कीर्तन करायला मला २२ वर्ष झाली. आतापर्यंत मी कीर्तनासाठी महाराष्ट्रात फिरतो एवढा की, मी आता १३ वी स्कार्पिओ गाडी घेतली. मला फक्त ११ महिने गाडी टिकते, अकराव्या महिन्याला गाडी वाजायला लागते, आता तर ३ महिन्यातच वाजायला लागते, असं इंदुरीकर म्हणतात.


आता प्रबोधनकार इंदुरीकर


हभप इंदुरीकर यांच्या कीर्तनाला होणारी गर्दी आणि सोशल मीडियावर मिळणारा प्रतिसाद आता ऐतिहासिक होत चालला आहे. इंदुरीकरांच्या कीर्तनावर आता सर्वबाजूने चर्चा होण्यास सुरूवात झाली आहे. मात्र इंदुरीकर हे कसलेले पहेवानासारखे सर्वांना, टायमिंग साधून उत्तर देत आहेत. इंदुरीकरांनी आपल्या कीर्तनातून याविषयी उत्तर दिलं आहे.


काहींना इंदुरीकर भावतात, पण...


हभप, प्रबोधनकार इंदुरीकर आता गावोगावी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांची चर्चा तर होणारच. त्यात इंदुरीकरांच्या कीर्तनातली शेरेबाजी आवडत नसल्याचं काहींचं म्हणणं आहे. तसे म्हणणारे फार कमी असले, तरी वास्तवाची किनार इंदुरीकरांच्या कीर्तनाला असल्याने, अशा टीकाकारांचं फार काही कुणी मनावर घेत नसल्याचं देखील चित्र आहे.


कीर्तनासाठी इंदुरीकर किती पैसे घेतात...


इंदुरीकर त्यांच्या कीर्तनासाठी खूप पैसे घेतात, अशी कोल्हेकुई सुरू झाल्यानंतर इंदुरीकरांनी त्या प्रश्नाला आपल्या कीर्तनातून उत्तर दिलं आहे. इंदुरीकर यावर बोलताना म्हणतात, की मला सुद्धा संसार आहे, बायको मुलं आहेत. तरीही मी कधीही कीर्तनासाठी ठरवून पैसे घेतले नाहीत, कुणीतरी सांगून जावं, की इंदुरीकरांनी कीर्तन एवढ्या पैशात होईल असं सांगितलं.


ऐका इंदुरीकरांच्या खालील व्हिडीओत ते कीर्तनासाठी किती पैसे घेतात....


इंदुरीकरांनी कीर्तनासाठी आपण खूप पैसे घेतो असे म्हणणाऱ्यांना आपल्या कीर्तनातून उत्तर दिलं आहे, इंदुरीकर यांनी त्यांच्यावर, त्यांच्या पश्चात टीका करणाऱ्यांना कसं उत्तर दिलं आहे, ते तुम्ही इंदुरीकरांच्याच तोंडून खालील व्हिडीओत ऐका...