Anant Ambani Engagement: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्यासाठी आजचा दिवस मोठ्या आनंदाचा आहे. मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी लवकरच लग्नबंधनात (Anant Ambani Marriage) अडकणार आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांचा रोका समारंभ म्हणजेच साखरपुडा आज पार पडला. राजस्थानमधील नाथद्वारा इथल्या श्रीनाथजी मंदिरात अंबानी आणि मर्चट कुटुंबिय तसंच मित्र मैत्रीणींच्या उपस्थित हा समारंभ पार पडला. तुम्हाला माहित आहे का अनंत अंबानी रियायन्स उद्योग समूहातील कोणता बिझनेस सांभाळतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनंत अंबानी यांच्यावर मोठी जबाबदारी
अनंत अंबानीचा जन्म 10 एप्रिल 1995 रोजी झाला. मुकेश अंबानी यांनी अनंत अंबानी याच्याकडे नुकतीच रिलायन्स उद्योग समूहातील न्यू एनर्जीची (Reliance New Energy Business) जबाबदारी सोपवली आहे. सध्या अनंत अंबाना रिलायन्स 02C आणि रिलायन्स न्यू सोलर एनर्जीचे संचालक म्हणून काम पाहतो.


तीन मुलांकडे कोणते उद्योग
मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश दूरसंचार व्यवसायाची (Telecommunication) धुरा सांभाळणार आहे. तर मुलगी रिटेल उद्योगची (Retail Industry) जबाबदारी सांभाळते. आता धाकटा मुलगा उर्जा व्यवसायाची (Energy) कमान सांभाळणार आहे. फेब्रुवारी 2021 मध्ये अनंतला रिलायन्स ओ2सी (Reliance O2C) व्यवसायाचं संचालकपद देण्यात आलं होतं. त्याआधी जियो (JIO) प्लॅटफॉर्म आणि रिलायन्सच्या रिटेल वेंचर्सच्या बोर्ड व्यवस्थापनमध्ये त्यांना सहभागी करुन घेण्यात आलं होतं. 


अनंत अंबानीचं शिक्षण किती?
अनंत अंबानी यांनी ब्राऊन युनिव्हर्सिटीतून (Brown University) आपलं शिक्षण पूर्ण केलं. आता अनंत रिलायन्स ग्रुपमध्ये आपल्या वडिलांबरोबर कामकाज वाढवण्यावर लक्ष देत आहे. 


अनंत अंबनी अडकणार लग्नबंधनात
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा आज साखरपुडा संपन्न झाला. व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रात सक्रिय असण्यासोबतच राधिका एक उत्तम भरतनाट्यम नृत्यांगना आहे.लउद्योगपती वीरेन (viren merchant) आणि शैला मर्चंट यांची राधिका ही मुलगी आहे. भारतीय उद्योग क्षेत्रात वीरेन मर्चेंट हे एक मोठं नाव आहे. देशातील धनाढ्य व्यक्तींच्या यादीत वीरेन मर्चंट यांचंही नाव घेतलं जातं. 


राधिकाचं शालेय शिक्षण मुंबईतील कॅथड्रियल अँड जॉन कॉनन स्कूल आणि इकोल मोन्डियल वर्ल्ड स्कूलमधून पूर्ण केले आहे. पुढे तिनं न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीतून पॉलिटिकल सायन्सचं शिक्षण पूर्ण केलं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 2017 मध्ये तिनं इसप्रावा टीममध्ये sales Executive म्हणून नोकरी सांभाळली. 


राधिकाने वयाच्या 24 व्या वर्षी आपल्या करिअरची सुरुवात केडार कन्संलटंट, देसाई अॅंड दिवानजी आणि इंडिया फर्स्ट यांसारख्या कंपनीतून केली. राधिका अॅनिमल वेलफेयर संबंधित काम करते. शिवाय ती इतरही स्वयंसेवी संस्थांसोबत काम करताना दिसते.