Uday Samant met Sharad Pawar at Silver Oak :राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्यासाठी थेट सिल्व्हर ओक निवासस्थान गाठले. अचानक भेट होत असल्याने राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान, या भेटी मागे कोणतेही राजकारण नाही. तसे कोणीही करु नये, असे उदय सामंत म्हणाले. अखिल भारतीय नाट्यपरिषदेची निवडणूक आहे. याची माहिती देण्यासाठी आपण पवार यांना भेटलो, असे सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उद्योगपती गौतम अदाणी यांनी कालच शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीबाबत अधिक माहिती पुढे आलेली नाही. मात्र, आज शिंदे गटाचे नेते आणि मंत्री सामंत यांनी पवारांची  भेट घेतल्यामुळे चर्चा सुरु झालेय. पवार हे नाट्य परिषद निवडणुकीबाबत ही भेट होती. ते या परिषदेचे प्रमुख आहेत. त्यामुळे त्यांची भेट घेतली आणि त्यांना माहिती दिली. ही राजकीय भेट नव्हती, असे सामंत यांनी स्पष्ट केले.


दरम्यान, पवार यांची भेट घेतल्यानंतर मीडियाशी बोलताना या भेटीबाबत स्पष्टीकरण दिले. यावेळी काही प्रश्नांवर त्यांनी भाष्य केले. सत्तासंघर्षाची बाजु आमच्या वकीलांना चांगल्या पद्धतीने मांडली आहे. आमच्या वकीलांनी चांगल्या पद्धतीनं बाजू मांडली आहे. त्यामुळे योग्य तो निर्णय असं माझं मत आहे. त्यामुळे  एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील आणि पुढचे मुख्यमंत्रीच असतील, असे सामंत म्हणाले. तसेच खारघर दुर्घटनेवर ते म्हणाले, कोरोनाच्या काळातील मृत्यू झाले. त्याचे गुन्हे कुणावर दाखल करायचे, असा सवाल केला.



मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. आम्ही विकास करण्यावर भर देत आहेत. त्यामुळे कोणी काहीही बोलले तरी आम्ही त्याकडे लक्ष देत नाही. कोण वृत्तपत्रातून टीका करत आहेत, ते सगळ्यांनाच माहित आहे. ते काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीवर टीका करत आहेत. त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. अजित पवार यांची विचारधारा वेगळी आहे. त्यांनी त्यांची विचारधारा बदलली तर त्यांच्याबाबत मुख्यमंत्री शिंदे आणि पंतप्रधान मोदी हे त्याबाबत निर्णय घेतील, असे सामंत म्हणाले. दरम्यान, पवार यांच्या भेटीमागे मराठा आरक्षणाबाबत चर्चा झाल्याचीही सूत्रांची माहिती आहे.